Jupiter-Sized Objects Floating In Space : चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेमुळं भारतात एकाएकी अवकाश आणि त्याबाबतच्या अनेक धारणा, रहस्यांना चालना मिळाली. अनेक प्रश्नांच्या उत्तरांची फोड झाली आणि पाहता पाहता सोप्या भाषेत अवकाश सर्वांसमोर आलं. तिथं नासानंही हल्लीच्या दिवसांमध्ये सुरु असणारी त्यांची संशोधनं जगजाहीर करत या कुतूहलात आणखी भर घातली. त्यातच आता आणखी एक रंजक माहिती समोर आली असून, संशोधकांपुढं आणखी एक गूढ वास्तव समोर आलं आहे.
माननिर्मित अतीसूक्ष्म हालचाली टीपण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वाधिक प्रभावी अशा जेम्स वेब या दुर्बिणीनं (James Webb Space Telescope) गुरुच्या आकाराचे काही महाकाय ग्रह अवकाशात तरंगत असल्याचं म्हणत त्यांचा कोणत्याही ताऱ्याशी संबंध नसल्याची माहिती BBC नं प्रसिद्ध तेली. या ग्रहांना प्राथमिक स्वरुपात 'ज्युपिटर मास बायनरी ऑब्जेक्ट' अशी नावं देण्यात आली आहेत.
ओरायन नेब्युलाशी संबंधित करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहितीच्या माध्यमातून या ग्रहांच्या जवळपास 40 जोड्या सध्या प्रकाशात आल्या. या गोष्टींचा आकार इतका लहान आहे की त्यांना तारा म्हणूनही संबोधता येणार नाही. पण, त्यांना कोणतीही कक्षा नसल्यामुळं त्यांचा ग्रह म्हणूनही उल्लेख केला जाण्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक स्तरावर सध्या समोर आलेल्या या तरंगत्या गोष्टींनी अंतराळविषयक अभ्यासात योगदान देणाऱ्या तज्ज्ञ मंडळींनाही पेचात पाडलं आहे.
New space images!
The NASA/ESA/CSA James #Webb Space Telescope has added detailed images of the Orion Nebula to our ESASky application.
Zoom into this region with a rich diversity of phenomena including protostars, brown dwarfs and even free-floating planets! pic.twitter.com/In4FQk8hrX
— ESA (@esa) October 2, 2023
European Space Agency (ESA) कडून या संशोधनासंदर्भातील काही अंदाज वर्तवण्यात आले. जिथं पहिल्या अंदाजानुसार नेब्युलाबाहेर या ग्रहवजा गोष्टींची निर्मिती झालेली असावी. दुसरा तर्क म्हणजे हे ताऱ्यांभोवती जन्माला आलेले ग्रहच असून, गुरुत्त्वाकर्षण नियमांमुळं ते दूर फेकले गेले असावेत.