लेकीचा पहिला फोटो शेअर करत बॉलिवूड अभिनेत्री भावूक

काही वर्षांपूर्वीच एका व्यवसायिकाशी तिने लग्नगाठ बांधली होती. 

Updated: May 14, 2019, 10:14 AM IST
लेकीचा पहिला फोटो शेअर करत बॉलिवूड अभिनेत्री भावूक  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : आयपीएल, आगामी क्रिकेट विश्वचषक, आगामी चित्रपट अशा सर्व चर्चा सोशल मीडियावर सुरु असतानाच एका अभिनेत्री सोशल मीडिया पोस्ट अनेकांचच लक्ष वेधत आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या संपर्कात असणारी ही अभिनेत्री आणि सुरवीन चावला. टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वात आपली ओळख प्रस्थापित केल्यानंतर सुरवीनने तिच्या कुटुंबालाही तितकच प्राधान्य दिलं. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलीला जन्मही दिला. आपल्या याच लाडक्या लेकीचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

“To love ...I know now.... ”, असं एकाच ओळीत खुप काही सांगणारं भावनिक कॅप्शन तिने या फोटोवर लिहिलं. सुरवीनचा हा फोटो पाहता अनेकांनीच त्यावर सुरेख अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये सुरवीन ही तिच्या लेकीला कुरवाळताना दिसत आहे. कर, आईच्या खांद्यावर डोकं ठेवून ही गोंडस चिमुरडी शांत झोपल्याचं दिसत आहे. अनेक भावना या एका फोटोतून पाहायला मिळत आहेत. हा फोटो पाहता सुरवीन आणि तिच्या मुलीने त्यांचं पहिलंवहिलं फोटोशूट केल्याचं लक्षात येत आहे. मुख्य म्हणजे फोटोशूटच्या या ट्रेंडमध्ये माय- लेकीची ही जोडी खऱ्या अर्थाने सुपरहिट ठरत आहे. 

 
 
 
 

A post shared by Surveen Chawla (@surveenchawla) on

लग्न झाल्यापासून ते गरोदरपणाच्या बातमीपर्यंत बरीच माहिती सुरवीनने सोशल मीडियाच्याच माध्यमातून दिली. इटलीत तिने व्यावसायिक अक्षय ठक्कर याच्याशी लग्नगाठ बांधली होती. अतिशय खासगी अशा सोहळ्यात त्यांनी एकमेकांना साथ देण्याची वचनं दिली होती. लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी तिने याविषयीची माहिती सर्वांना दिली होती.