तनुश्रीच्या कारवरील हल्ल्याचं व्हायरल सत्य...

तो व्हिडिओ खोटा...  

Updated: Oct 1, 2018, 10:51 PM IST
तनुश्रीच्या कारवरील हल्ल्याचं व्हायरल सत्य...  title=

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर याच्या वादांना आता वेगळं वळण मिळालं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वीत एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तनुश्रीच्या कारवर काही इसमांनी हल्ला केल्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

तनुश्री प्रकरणातील या व्हिडिओमुळे या प्रकरणानंतर पुन्हा नव्या चर्चांनी डोकं वर काढलं पण, आता मात्र त्या व्हिडिओमागचं खरं सत्य समोर आलं आहे. झी मीडियाचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांनी या व्हिडिओमागचं खरं सत्य सर्वांसमोर आणलं आहे. 

मुख्य म्हणजे या व्हिडिओशी नाना पाटेकर यांचा काहीच संबंध नसल्याची बाबही इथे उघड होत आहे.

काय आहे हे व्हिडिओ प्रकरण? 

२००८ मधील हा व्हिडिओ मुंबईच्या फिल्मीस्तान स्टुडिओ येथील आहे. 

हा आहे खरा वाद..

'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर माध्यमांचे प्रसिनिधी तनुश्रीची मुलाखत घेण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी ती बरेच तास आपल्या व्हॅनिटी वॅनमध्येच बसून होती. अखेर माध्यमांना तिची मुलाखत काही मिळाली नाही. त्यादरम्यानच तनुश्रीचे वडील आणि कॅमेरामन यांच्यात झालेल्या बाचाबाचीमध्ये कॅमेऱ्याचं मोठं मुकसान झालं. हा वाद इतका विकोपास गेला की त्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन यांनी थेट तनुश्रीच्या कारवरच हल्ला केला. या संपूर्ण घटनेनंतर तनुश्री आणि त्या वाहिनीचे प्रतिनिधी गोरेगाव पोलीस स्थानकात पोहोचले होते. 

व्हिडिओत दिसणारे कॅमेरामन काय म्हणत आहेत पाहिलं....

या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कॅमेरामन पवन भारद्वाज यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 

या व्हायरल व्हिडिओमधील सत्य उघधड करण्यात येत नाहीये. त्यावेळी मी आणि रिपोर्टर महिला तेथे होती. तेव्हा मुलाखत घेण्यासाठी म्हणून आम्ही तेथे गेलो असता अभिनेत्रीच्या वडिलांनी आमच्यावर हल्ला केला, अशा वेळी आम्ही काय करणं अपेक्षित होत? त्यावेळी असाच काहीसा प्रसंग आमच्यासोबत घडला होता. 

त्या दिवशी फिल्मीस्तामध्ये आम्हाला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बोलवण्यात आलं होतं. पण, सहा वाजले तरीही तेथे काहीच हालचाल नव्हती. सहा वाजण्याच्या सुमारास एक होंडा सिटी कार तेथे आली आणि तनुश्री त्यात बसून बाहेरच्या दिशेला निघाली त्याचवेळी कॅमेरा सुरु करुन ते चित्रीत करतेवेळी तिचे वडील आमच्या अंगावर धावून आले.

त्यांनी कॅमेरा जमिनीवर आपटला. माझ्यासोबत असणाऱ्या वार्ताहरालाची त्यावेळी मारहाण करण्यात आली. ज्यानंतर ते कारमध्ये बसून तिथून निघाले. 

हा व्हिडिओ नेमका आताच कसा व्हायरल झाला याची आपल्याला कल्पना नसल्याचंही त्या कॅमेरामनने स्पष्ट केलं. पण, ही बाब अतिशय चुकीची असून त्याविरोधात योग्य ती कारवाई झाली पाहिजे हा मुद्दाही त्यांनी मांडला. त्या प्रसंगानंतर तनुश्रीने आमच्याविषयी काही वक्तव्य केलं नाही. आपणही तिच्याबाबत आता काहीच बोलू इच्छित नाही, असं म्हणत त्यांनी चुकीची कारणं देत हा व्हिडिओ दाखवणं थांबवा असंही सांगितलं. 

चर्चेतून वाद मिटला होता....

त्यावेळी त्या वाहिनीमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींच्या मते हा वाद चर्चेतून मिटवण्यात आला होता.

ज्यानंतर वाहिनीकडून काही दिवसांसाठी तनुश्रीच्या वापरासाठी एका महागड्या कारची सोय करण्यात आली होती. त्याशिवाय त्या वाहिनीशीच जोडल्या गेलेल्या एका कंपनीसाठी तनुश्रीमने परफॉर्मन्सही दिला होता.

दरम्यान, खुद्द नाना पाटेकर यांनी हा प्रसंग घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका पत्रकार परिषदेत त्यामागील सत्य सर्वांसमोर उघडही केलं होतं.