कपूर कुटुंबातील आणखी एका सदस्याच्या प्रेमाची जाहीर कबुली

लवकरच लग्नसराई 

Updated: Aug 7, 2020, 04:58 PM IST
कपूर कुटुंबातील आणखी एका सदस्याच्या प्रेमाची जाहीर कबुली
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कपूर कुटुंबामध्ये मागील वर्षी लग्नसराईचे वारे पाहायला मिळाले. त्यामागोमाग अभिनेरा रणबीर कपूर आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडीसुद्धा यंदाच्या वर्षी लग्नगाठ बांधण्याचा अंदाज वर्तवला गेला. पण, कोरोनाच्या महामारीमुळं हे बेत काहीसे लांबणीवर पडल्याचं कळत आहे. असं  असतानाच आता बी- टाऊनच्या या प्रतिष्ठीत कुटुंबातील आणखी एका व्यक्तीच्या रिलेशनशिपची अखेर सर्वांनाच माहिती झाली आहे.

रणबीर कपूर नाही, तर आता ही व्यक्ती नेमकी कोण असाच प्रश्न तुमच्याही मनात आला ना? तर, कपूर कुटुंबातील ही व्यक्ती आहे, रिमा जैन म्हणजेच राज कपूर यांच्या मुलीचा मुलगा आदर जैन. आदरच्या वाढदिवसाच्याच निमित्तानं त्याची प्रेयसी, अभिनेत्री तारा सुतारिया हिनं इन्स्टाग्रामवर त्याला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Ever thine, ever mine, ever ours! Happy Birthday to my favourite person @aadarjain 

A post shared by TARA (@tarasutaria) on

तारानं आदरसोबतचा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर रिद्धीमा कपूरनं कमेंट करत आनंद व्यक्त केला. आतापर्यंत तारा आणि आदर यांना विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं आहे. शिवाय कपूर कुटुंबीयांच्या कार्यक्रमांनाही तिची हजेरी असते. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी जाहीरपणे एखादी पोस्ट करत नात्याची कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ताराच्या या पोस्टवर आदरचीही कमेंट पाहण्याजोगी आहे. कलावर्तुळातही आता या सेलिब्रिटी जोडीत्या नात्याची बरीच चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षाबंधनच्या निमित्तानं कपूर कुटुंबीयांनी एकत्र येत हा सण साजरा केला. त्यावेळी कपूर कुचुंबीयांच्या या गर्दीत ताराचीही उपस्थिती अनेकांचं लक्ष वेधून गेली.