पिंकी येतेय.. कोण आहे ही पिंकी?

प्रेक्षकांसमोर येणार पिंकीचं खर रूप.

Updated: Aug 7, 2020, 02:30 PM IST
पिंकी येतेय.. कोण आहे ही पिंकी?

मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' आता आणखी एक वळण घेत आहे. शनाया आणि राधिका एकत्र येऊन गुरूनाथला अद्दल घडवणार आहेत. एवढे दिवस या दोघी 'पिंकी-चिंकी' नावाने एकत्र येऊन काम करत होत्या. पण आता पिंकी म्हणून नवी व्यक्ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही व्यक्ती कोण असणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

सुखी संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. राधिका आणि शनाया गुरुनाथ ला धडा शिकवण्यासाठी एकत्र आल्या आहेत, गुरुनाथ चा भांडाफोड करण्यासाठी दोघी पिंकी आणि चिंकी असे कोडवर्ड वापरून एकमेकांच्या संपर्कात आहेत.

दोघीनाही मायासमोर गुरुनाथ चा खोटेपणा सिद्ध करून तिला आपल्या बाजूने करून घ्यायचंय. गुरुनाथ पण हि पिंकी कोण आहे याचा शोध घेतोय, त्यासाठी तो मम्मा आणि केडी ची मदत घेतोय, पण आता हि पिंकी लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, कोण असेल हि पिंकी राधिका कि अजून दुसरं कोणी? यासाठी रोज रात्री ८. वा. माझ्या नवऱ्याची बायको चे येणारे भाग पाहायला विसरू नका.