पत्नीसाठी खिलाडी कुमार करायला गेला एक, झालं एक...

ट्विंकल खन्नाने यानंतर एक गोष्ट ठरवली की.... 

Updated: Dec 11, 2019, 03:58 PM IST
पत्नीसाठी खिलाडी कुमार करायला गेला एक, झालं एक...
अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना

मुंबई : कलाविश्वातील आपली कारकिर्द सांभाळण्यासोबतच कामाच्या या व्यापातही अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या कुटुंबालाही तितकंच महत्त्व देतो. मुख्य म्हणजे य़ा दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखण्याचं कसब त्याला चांगल्या पद्धतीने अवगत झालं आहे. पत्नी म्हणू नका किंवा मग मुलं. प्रत्येकालाच आनंदी ठेवण्यासाठी हा 'सुपरकूल खिलाडी कुमार' कायमच काहीतरी शक्कल लढवत असतो. पण, प्रत्येक वेळी तो यात यशस्वी ठरतोच असं नाही. 

ट्विंकल खन्ना हिची एक सोशल मीडिया पोस्ट पाहता याचा अंदाज येत आहे. माध्यमांमध्ये चर्चेत असणाऱ्या वृत्तानुसार ट्विंकलने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये अगदी गडद कॉफीचा कप घेऊन उभा असणारा तो व्यक्ती म्हणजे खुद्द Akshay Kumar अक्षय कुमारच आहे. ज्याचा कॉफी बनवण्याचा प्रयत्न फसला आणि करायला गेला एक, झालं एक याचा प्रत्ययच जणू त्याला आला. बरं, यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या पत्नीने, ट्विंकलने ही बाब सर्वांपर्यंत पोहोचवलीसुद्धा. 

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये ट्विंकलने लिहिलं, 'लेखकांना कॅफिनची तितकीच गरज असते. जितकी एखाद्या पेन्सिलला ग्रॅफाईटची. पण, हे एकच कारण आहे ज्यासाठी मी त्याला माझ्यासाठी कधीच एक कपभर कॉफी करायला सांगत नाही.' 

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

ट्विंकलची ही पोस्ट पाहता अनेक जोडप्यांना त्यांच्या नात्याची ही धमाल बाजू लक्षात आली. कमेंटमध्ये कोणी या सेलिब्रिटी जोडीप्रती प्रेम व्यक्त केलं. तर, काहींनी त्यांचे अनुभवही सांगिलते. सहसा घरातील नेक कामांमध्ये किंवा अमुक एका गोष्टींध्ये कोणा एका व्यक्तीचा हातखंड असतो. तिच कामं दुसऱ्यांच्या हाताशी गेल्यावर एकतर ती अतिशय चांगली होतात, काहीशी वाईट होतात किंवा सवयीप्रमाणे ती सर्वांच्या पसंतीस उतरतीलच असंही नाही. ही सर्वच परिस्थिती ट्विंकलच्या एका पोस्टमधून समोर येत आहे.