असा आहे रिंकू राजगुरूचा 'मेकअप'

मराठीतील तिसरा सिनेमा 

Updated: Dec 11, 2019, 03:28 PM IST
असा आहे रिंकू राजगुरूचा 'मेकअप'

मुंबई : 'सैराट' सिनेमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रिंकु राजगुरूच्या तिसऱ्या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'मेकअप' असं आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातून एक वेगळीच 'मेकअप' केलेली रिंकू प्रेक्षकांसमोर आली आहे. 'मेकअप' हा रिंकू राजगुरूचा तिसरा सिनेमा आहे. 

'सैराट' सिनेमाच्या प्रतिमेला तडा देत रिंकू राजगुरू या सिनेमात अतिशय हटके रुपात दिसत आहे. रिंकू राजगुरू या सिनेमात दंगा करणारी लोकांच्या नाकी नऊ आणणारी दिसत आहे. एका बाजूला ती संस्कारी दिसतेय तर दुसऱ्याच बाजूला तिच्यातील खोडकरपणा समोर आला आहे. 

रिंकू या टीझरमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. घरात अतिशय संस्कारी, सोज्वळ आणि लाजाळू असणारी रिंकू एकट्यात तेवढीच बिनधास्त आणि निर्भीड दिसत आहे. रिंकूने एकाचवेळी दोन 'मेकअप' केल्याचं यातून सांगायचं आहे का? असा विचार प्रेक्षकांना पडत आहे. 

100 टक्के संस्कारी आणि 100 टक्के लाजरी बुजरी असणारी रिंकू सिनेमाच्या दुसऱ्या बाजूला दारू पिऊन निर्भीडपणे बोलताना दिसत आहे. 'हर देवदास की गर्लफ्रेंड पारू नही होती, और सिक्स परसेन्ट अल्कोहोलवाली बिअर कभी दारू नही होती', असं म्हणतं रिंकू एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. रिंकूसोबत या सिनेमात चिन्मय उदगीरकर दिसणार आहे.  तर 'मेकअप' सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश पंडितने केलं असून पुढच्या वर्षी ७ फेब्रुवारी 2020 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे