सैफ- करीनाच्या कुटुंबात पुन्हा Good News

करीना म्हणे.... 

Updated: Aug 12, 2020, 04:51 PM IST
सैफ- करीनाच्या कुटुंबात पुन्हा Good News
संग्रहित छायाचित्र

मुंबई : काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खान आणि तिचा पती, अभिनेता सैफ अली खान हे दोघंही त्यांच्या नव्या घरात राहण्यासाठी जाणार असल्याच्या चर्चा होत्या. खुद्द सैफनं एका मुलाखतीत याबाबतची माहितीही दिली होती. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देणाऱ्या बी- टाऊनच्या या नवाबाच्या घरी आता आणखी एक आनंदाही बातमी असल्याचं म्हटलं जात आहे. 

सध्या सुरु असणाऱ्या या चर्चांमध्ये सैफच्या कुटुंबाकडून अत्यंत आनंदाची बातमी जाहीर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. ही बातमी चाहत्यांच्या चेहऱ्यावरही लकाकी आणत आहे. कारण, करिना कपूर खान हिला पुन्हा एकदा मातृत्त्वाची चाहूल लागली आहे अशा चर्चांनी जोर धरला आहे. 

'आम्हाला हे कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की, आमच्या कुटुंबात आता एक नवी गोष्ट जोडली जाणार आहे. सर्वांनीच दिलेलं प्रेम आणि आधारासीठी आम्ही आभारी आहोत', असं या सेलिब्रिटी जोडीच्या कुटुंबाकडून म्हटलं गेलं. 

मुख्य म्हणजे इथे कुठेच बाळाचा किंवा गरोदरपणाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. किंबहुना सोशल मीडियावर असणाऱ्या करीनानंही अशी कोणतीही पोस्टही शेअर केलेली नाही. त्यामुळं याबाबतच खुद्द करिना काही अधिकृत माहिती देते का, याकडेच सर्वांचं लक्ष आहे. त्याहूनही सैफिनाच्या कुटुंबात आलेली ही आनंदाची बातमी नेमकी आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकजण उत्सुक आहेत. 

एकिकडे करीनाचे वडील, ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना या चर्चांविषयी विचारलं असता, ही बातमी खरी असेल तर मलाही आऩंदच आह.... असं वक्तव्य केलं आहे. शिवाय करीनानंही दोन वर्षांपूर्वी तिच्या कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनाविषयी विचारलं असता आणखी दोन वर्षांनी याबाबतचा विचार करणार असल्याचं सूचक विधानही केलं होतं. त्यामुळं आता याविषयीची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x