Sunny Leone | बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत काय म्हणाली?

रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरु असलेलं युद्ध क्षमण्याचं नाव घेत नाहीये. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहेत.  

Updated: Mar 2, 2022, 11:24 PM IST
Sunny Leone | बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत काय म्हणाली?  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरु असलेलं युद्ध क्षमण्याचं नाव घेत नाहीये. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहेत. या सर्व संकटाचा सामना हा रशिया आणि युक्रेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही (India Student) बसला आहे. युद्धाच्या परिस्थितीत अनेक विद्यार्थी तिथे अडकले आहेत. (bollywood hot actress sunny leone emotional due to indian students stucks in russia and ukraine)

आपले भारतीय विद्यार्थी अडचणीत सापडल्याने सर्वच भारतीयांची चिंता वाढली. आपले भावी डॉक्टर कसे परत येणार असे एक ना अनेक प्रश्न पडू लागले. याबाबत विचार करुन आपल्याच त्या विद्यार्थ्यांची इतकी चिंता वाटतेय, मग त्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची काय स्थिती असेल, याबाबत आपण विचारही करु शकत नाहीत. 

या सर्व प्रकरणावरुन बॉलिवूडची बेबी डॉल हॉट अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) प्रतिक्रिया दिली आहे. अगदी याच मुद्द्याला सनीने हात घातला आहे. या विद्यार्थ्यांचा विचार करुन सनी भावूक झाली. सनिला अश्रू अनावर झाले. 

सनी काय म्हणाली?

"मला खूप वाईट वाटतंय.अशा परिस्थितीत आपण प्रार्थना करण्याशिवाय काही करू शकत नाही. सगळं सुरळीत होऊ देत, अशी पार्थना सनीने केली. "पालकांनी आपल्या मुलांना शिकायला पाठवलं आहे, त्यांची काय अवस्था असेल, त्यांची मनाची काय घालमेल सुरु असेल, याचा आपण अंदाजही लावू शकत नाहीत", असंही सनीने म्हटलं.  

"सर्व सुरळीत व्हावं यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करायला हवी. पालकांनी धीर धरावा, सर्व काही ठीक होईल", अशा शब्दात सनी लियोनीने विद्यार्थ्यांच्या पालकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.