अंडरवर्ल्डशी बॉलिवूडचं असं नातं; कंगनाचा गौप्यस्फोट

तिनं पुन्हा एकदा करण जोहरवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.   

Updated: Aug 14, 2020, 03:31 PM IST
अंडरवर्ल्डशी बॉलिवूडचं असं नातं; कंगनाचा गौप्यस्फोट
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कंगना राणौत आणि बॉलिवूडमधील काही नावाजलेली प्रस्थ यांमध्ये असणारा वाद काही नवा नाही. कंगनाची जहाल मतं आणि त्यावर ठाम असणारी ही अभिनेत्री चर्चांच्या सत्रांपेक्षा वादांच्या भोवऱ्यात अधिक असते. सध्या कंगनानं लक्ष वेधलं आहे ते म्हणजे अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये असणाऱ्या नात्याबाबतच्या तिच्या एका गौप्यस्फोटामुळं. 

कंगना राणौतच्या नावे तिच्या Team Kangana Ranaut या ट्विटर अकाऊंटवरुन अंडर्लवर्ल्डच्या उरल्या सुरल्या गोष्टींवर बॉलिवूड चालतं, असं मत पोस्ट करण्यात आलं. इतकंच नव्हे, तर तिनं पुन्हा एकदा करण जोहरवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. 

''हे खरं आहे. बॉलिवूड अंडरवर्ल्डच्या उरल्यासुरल्यावरच सुरु आहे. दहावी नापास पप्पांचा पप्पू आणि पप्पांची परी असंच काहीसं. त्यांचा वेडेपणा आणि अकार्यक्षमता 'कॉफी विथ करण'सारख्या कार्यक्रमांमध्ये दाद मिळवून जाते. ते अधिक प्रमाणात हिंदूफोबिकही आहेत... '', असं ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आलं. 

width: 640px; height: 102px;

 

सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटला उत्तर देत कंगनाची ही प्रतिक्रिया पाहायला मिळाली. ज्यानंतर तिच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली. मुख्य म्हणजे अंडरवर्ल्ड आणि कलाविश्वाशी असणाऱ्या नात्यानंही अनेकांचं लक्ष वेधलं. कंगनाचं हे वक्तव्य आणि तिची भूमिका पाहता आता बॉलिवूडमधून कोणी या प्रश्नावर नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.