'मणिकर्णिका' रुपातील कंगनाची युट्यूबवरही जादू

प्रेक्षकांना मिळणार रणसंग्राम पाहण्याची संधी 

Updated: Oct 3, 2018, 08:15 PM IST
'मणिकर्णिका' रुपातील कंगनाची युट्यूबवरही जादू

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आव्हानात्मक भूमिकांना न्याय देते. अशाच एका प्रभावी भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. त्याचीच एक झलक नुकतीच पाहायला मिळाली. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. 

अवघ्या काही सेकंदांमध्येच हा टिझर असा काही व्हायरल झाला की पुढच्या काही तासांतच त्याला एक कोटींहून जास्त व्ह्यूज मिळाले. 

झाशीच्या राणीची व्यक्तीरेखा साकारणारी कंगना प्रेक्षकांच्या मनात चांगलीच घर करुन गेली आहे, हेच टिझरला मिळणारा प्रतिसाद पाहून म्हणावं लागेल. 

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची जितकी चर्चा होती तितकीच किंबहुना त्यातूनही जास्त चर्चा या टिझरची झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने युट्यूबवर मणिकर्णिका रुपातील कंगनाची धूम आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

राधा कृष्ण जगरलमूडी दिग्दर्शित या चित्रपटातून ऐतिहासिक कथानकावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे एक रणसंग्राम पाहण्याची संधीच या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे.