VIDEO : ढोल ताशांच्या गजरात, 'आला रे आला सिंबा आलाsssss'

अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'सिंबा' या चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. 

Updated: Dec 20, 2018, 04:37 PM IST
VIDEO  : ढोल ताशांच्या गजरात, 'आला रे आला सिंबा आलाsssss' title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'सिंबा' या चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एका मागोमाग एक चित्रपटातील गाणीही प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली. त्यातच आता आणखी एका गाण्याची भर पडली आहे. 

'आला रे आला सिंबा आलाssss' असे बोल असणाऱ्या या गाण्यात रणवीर सिंगची चित्रपटातील भूमिका नेमकी कशी असेल याचा अंदाज लगेचच येत आहे. मराठमोळ्या अंदाजात या गाण्यात रणवीरचा लूक आणि त्याचं नृत्यकौशल्या सर्वांचच लक्ष वेधत आहे. भव्य सेट, बरेच सहकलाकार आणि त्याला या उडत्या चालीच्या गाण्याची साथ मिळाल्यामुळे हा 'सिंबा' प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. 

आला रे आला या गाण्याचे बोल जितके आकर्षक आहेत तितकंच त्याचं संगीतही लक्षवेधी आहे. शबीर अहमदच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला तनिष्क बागचीने संगीतबद्ध केलं असून, त्याने दिलेली चाल सर्वांनाच ठेका धरायला भाग पाडत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x