तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्याचा गुपचूप साखरपुडा

अभिनेत्रीशीच असणारं त्याचं हे हक्काचं नातं... 

Updated: Dec 3, 2019, 11:00 AM IST
तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्याचा गुपचूप साखरपुडा
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विविध मालिकांमध्ये नावारुपास आल्यानंतर वेब विश्वात आपली एक नवी ओळख निर्माण करणारा आणि मुख्य म्हणजे तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा एक अभिनेता सध्या त्याच्या आयुष्यात अत्यंत आनंदाचा काळ अनुभवत आहे. मालिका आणि वेब सीरिजच्या दुनियेत रमणारा तो अभिनेता आहे विक्रांत मेस्सी Vikrant Massey . 

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या विक्रांत मेस्सीचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. बऱ्याच काळापासून त्याची प्रेयसी असणाऱ्या अभिनेत्री शीतल ठाकूर हिच्यासोबत त्याने साखरपुडा केला. याविषयी खुद्द विक्रांतनेच माहिती दिली. 
'कोईमोई'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने एका छोटेखानी समारंभात आपला शीतलशी साखरपुडा झाल्याचं सांगितलं. योग्य वेळी आम्ही याविषयी जाहीरपणे बोलू. तुर्तास इतकंच सांगू इच्छितो की घरातल्या घरातच हा एक समारंभ पार पडला. लग्नाविषयी आम्ही नंतर बोलू', असं विक्रांत म्हणाला. 

 
 
 
 

A post shared by Sheetal Thakur (@sheetalthakur) on

विक्रांत आणि शीतलच्या नात्यातील या वळणाविषयी कळताच त्यांना चाहत्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. काहींना तर, आतापासूनच त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. शीतलविषयी सांगावं तर, तिने कायमच विक्रांतसोबतचे काही फोटो पोस्ट करत त्यांच्या नात्याची ग्वाही दिली आहे. 

 
 
 
 

A post shared by Sheetal Thakur (@sheetalthakur) on

काही दिवसांपूर्वीही त्याने हिमाचलमधील धरमशाला येथे जात शीतलच्या कुटुंबाची भेट घेतली होती. तेव्हा शीतलने तिच्या कुटुंबीयांसमवेत विक्रांतचे काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. २०१५पासून विक्रांत आणि शीतल एकमेकांना डेट करत होते. २०१७ पर्यंत त्यांनी हे नातं गुलदस्त्यात ठेवलं. पण, त्यानंतर मात्र त्यांनी या नात्याविषयी बरीच माहिती सर्वांपुढे आणली. अतिशय सुरेखपणे प्रेमाच्या नात्याला हाताळणारी ही जोडी आता लग्नाची बातमी केव्हा देते याचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.