.....त्याच्या बासरी वादनाने शंकर महादेवन मंत्रमुग्ध; पाहा व्हिडिओ

त्याच्या कलेची प्रशंसा करत शंकर महादेवन नेमकं काय म्हणाले पाहा....   

Updated: Jan 14, 2020, 03:55 PM IST
.....त्याच्या बासरी वादनाने शंकर महादेवन मंत्रमुग्ध; पाहा व्हिडिओ
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सोशल मीडियाचा अती वापर न करण्याचे सल्ले अनेकदा दिले जातात. अर्थात या माध्यमाचं व्यसन लावून घेतलं जात नाही, तोपर्यंत ते सर्वतोपरी आपल्या मदतीचंच ठरतं. अशा या अफलातून माध्यमाचा कलाकार मंडळीसुद्धा पुरेपूर वापर करतात. चाहत्यांशी एका वेगळ्या प्रकारचं नातं तयार करण्यापासून काही हरहुन्नरी कलाकारांना प्रकाशझोतात आणण्यासाठी म्हणून कलाकार मंडळी अनेकदा पुढाकार घेताना दिसतात. 

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे गायक शंकर महादेवन यांचं. कार्यक्रमाच्या निमित्ताने असो किंवा आणखी कोणत्या कारणाने नवनवीन ठिकाणांना भेट देणाऱ्या महादेवन यांनी बऱ्याचदा काही असे चेहरे सर्वांसमोर आणले आहेत, जे पाहता खरंच भारतात कलेची साधना करणाऱ्या कलाकारांची काहीच कमतरता नाही हे सिद्ध होत आहे. 

एखाद्या हॉटेलमध्ये काम करणारी व्यक्ती असो, किंवा विमानतळावर भेटणारी कुणी व्यक्ती. असे कित्येक अनोळखी चेहरे आणि त्यांनी अद्वितीय कला शंकर महादेवन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. यामध्ये आता आणखी एक कलाकार जोडला गेला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Dileep Heera from Assam !! Bless him folks !! So much talent in our country !!

A post shared by Shankar Mahadevan (@shankar.mahadevan) on

महादेवन यांनी यावेळी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आसामचे एक बासरी वादक त्यांची अप्रतिम कला सादर करताना दिसत आहेत. दिलीप हिरा असं त्यांचं नाव असून, शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाजाशी त्यांनी एक लहानशी जुगलबंदीही केली आहे. 

आपल्या देशात खुप साऱ्या कला आणि तितकेच कलाकारही दडलेले आहेत. त्यांना गरज आहे ती फक्त अशा एखाद्या दुजोऱ्याची, कलेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाची. एक कलाकार म्हणून शंकर महादेवन ही भूमिका अत्यंत सुरेखपणे निभावत असल्याचं त्यांच्या या व्हिडिओंतून सिद्ध होत आहे.