रणवीर सिंगच्या कारकिर्दीवर सावट, कोण देतंय धमकी?

. कोण आणि कशासाठी रणवीरला धमकी देतंय ?

Updated: Oct 27, 2021, 10:24 AM IST
रणवीर सिंगच्या कारकिर्दीवर सावट, कोण देतंय धमकी?  title=
रणवीर सिंग

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) यानं आतापर्यंतच्या कारकिर्दीत अतिशय चांगल्या वेगानं प्रसिद्धी आणि नाव कमवलं. कलेच्या बळावर रणवीरनं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. पण, आता अशी वेळ आली आहे, की रणवीरला धमक्या मिळू लागल्या आहेत. कोण आणि कशासाठी रणवीरला धमकी देतंय हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? 

तर, रणवीरला धमकी मिळत आहे, पण ही धमकी काही खरीखुरी नाहीये. त्यामुळे चिंतेचं कारण नाही. 

दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याचा आगामी, 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रमात हजेरी लावत आहे. 

रोहितनं अशाच एका कार्यक्रमात हजेरी लावली, ज्याचं सूत्रसंचालन रणवीर सिंग करत होता. तिथं एका प्रश्नाचं उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा रोहितला काही उत्तर जमेना. 

रोहितनं मग मदतीच्या आशेनं रणवीरकडे पाहिलं आणि तू मला मदत करशील ना, असं त्याला विचारलंही. पण, रणवीरनं त्यासाठी नकार दिला. 

रणवीरचा नकार पाहून, चित्रपट अद्यापही प्रदर्शित झालेला नाही, असं म्हणत आगामी चित्रपटातील भूमिका कापण्याचा इशारा किंबहुना इशारावजा धमकी मस्करीतच रोहितनं रणवीरला दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

रोहितची ही धमकी पाहून कारकिर्दीला धोका तर नाही? या भीतीनं रणवीरही मोठ्या कमाल अंदाजात त्यावर व्यक्त झाला. 

सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जिथे ही सारी धमाल पाहायला मिळत आहे.