हीच ती साधी माणसं... अरिजित सिंगनं जे केलंय ते पाहून तुम्हीही द्याल शाबासकीची थाप

अरिजित सिंग आणखी एका कारणासाठी चर्चेत आला, तो म्हणजे त्याचा साधेपणा.

Updated: Apr 17, 2022, 09:53 AM IST
हीच ती साधी माणसं... अरिजित सिंगनं जे केलंय ते पाहून तुम्हीही द्याल शाबासकीची थाप  title=
सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो

मुंबई : बेधुंद करण्याऱ्या आवाजानं प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गायक अरिजित सिंग यानं फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली जागा भक्कम केली. रिऍलिटी शो, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून अरिजितनं त्याच्या आवजाची ताकद धाकवून दिली. अरिजित सिंग आणखी एका कारणासाठी चर्चेत आला, तो म्हणजे त्याचा साधेपणा. (Arijit singh viral photo)

सध्या सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. अरिजित मुळचा मुर्शिदाबाद इथला असल्यामुळं त्यानं इथंच एका सरकारी शाळेमध्ये मुलाचा प्रवेश घेतला आहे.

यादरम्यानच तो शाळेच्या बाहेर इतर पालकांप्रमाणंच मुलाची प्रतीक्षा करताना दिसला. हे पहिल्यांदाच झालेलं नाही. यापूर्वीही त्याला स्थानिक परिसरामध्ये चहाच्या टपरीवरही पाहिलं गेलं आहे.

सोशल मीडियावर ज्या क्षणी हा फोटो व्हायरल झाला तेव्हा अनेकांना तर त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. कोणी इतकं साधं कसं असू शकतं, असं म्हणत काहींनी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

काहींनी अरिजितच्या याच स्वभावामुळं त्याच्यालेखी आपल्या मनात असणारी आदराची भावना आणखी वाढली आहे, अशाही कमेंट्स केल्या आहेत.

राहता राहिला प्रश्न अरिजितच्या गाण्यांचा तर, हिंदीसोबतच त्यानं मराठी आणि बंगाली भाषांच्या चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. तरुणाईच्या गळ्याती ताईत म्हणून या गायकाकडे पाहिलं जातं. त्याची एकंदर कारकिर्द पाहता ही त्याच्या हक्काची लोकप्रियता आहे असं म्हणण्यात गैर नाही.