Nehu Da Vyah : रोहनप्रीतच्या पत्नीच्या रुपात नेहा कक्करनं जिंकलं सर्वांचं मन

एकिकडे ही गायिका... 

Updated: Oct 21, 2020, 01:08 PM IST
Nehu Da Vyah : रोहनप्रीतच्या पत्नीच्या रुपात नेहा कक्करनं जिंकलं सर्वांचं मन
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी कलाविश्वात आपल्या कौशल्याच्या बळावर रिऍलिटी शो, त्याच शो ची परीक्षक ते लोकप्रिय सेलिब्रिटी असा प्रवास करणारी गायिका नेहा कक्कर सध्या बरीच चर्चेत आहे.  neha kakkar  नेहा चर्चेत येण्यास कारण ठरत आहे ते म्हणजे रोहनप्रीत सिंग याच्यासोबतचं तिचं नातं आणि अर्थातच 'नेहू दा व्याह'बाबतचं कुतूहल. 

एकिकडे ही गायिका विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत असतानाच, दुसरीकडे रुपेरी पडद्यावर मात्र ती रोहनप्रीतच्या पत्नीच्याच रुपात दिसत आहे. नेहाचं नवं गाणं Nehu Da Vyah प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ज्यामध्ये रोहनप्रीतसोबतच्या प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत कसा पोहोचतो हे दाखवण्यात आलं आहे.

नेहा आणि रोहनप्रीत या दोघांवर चित्रीत या गाण्याची फार आधीपासूनच प्रसिद्धी करण्यात आल्यामुळं चाहत्यांमध्ये त्याबाबतची कमालीची उत्सुकता पाहायला मिळत होती. त्यातच नेहा आणि रोहनप्रीत खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एक नवी सुरुवात करण्यास सज्ज होत असल्यामुळं या गाण्याला प्रदर्शित होताच अनेकांचीच पसंती मिळाली आहे. 

स्वप्नातलं जग, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले नेहा आणि रोहनप्रीत आणि त्यांची सुरेख केमिस्ट्री या गाण्याच्या जमेच्या बाजू ठरत आहेत. त्यातचही सोशल मीडियावर या गाण्यासंबंधीचे अनेक हॅशटॅगही ट्रेंडमध्ये असल्यामुळं ओओघानं Nehu Da Vyah प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे.