नवी दिल्ली : भारताला पहिलं विश्वचषक मिळवून देणाऱ्या माजी कर्णधार कपिल देव यांच्या दिर्घायुष्यासाठी आता समस्त क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटपटू प्रार्थना करत आहे. १८८३ साली त्यांनी भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून दिला. कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून रात्री अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांना रुग्णालयातून कधी सुट्टी मिळेल हे मात्र अस्पष्ट आहे.
क्रिकेट प्रेमींसोबतच त्यांचे चाहते देखील ते सुखरूप घरी परतावे म्हणून प्रार्थना करत आहेत. त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याकरता बॉलिवूडकर देखील मागे राहिले नाहीत. अभिनेता रणवीर सिंग आणि शाहरूख खानने ट्विटरच्या माध्यमाातून प्रार्थना केली आहे.
The Legend @therealkapildev embodies strength and resilience Praying for a speedy recovery of my main man
— Ranveer Singh (@RanveerOfficial) October 23, 2020
रणवीर सिंगचा आगामी चित्रपट कपिल देव यांच्या कामगिरीवर आधरलेला आहे. '83' चित्रपटामुळे कपिल देव आणि रणवीर सिंग यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं आहे. त्यामुळे रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
Get well sooner than soon Paaji! @therealkapildev wishing you a speedy recovery as fast as your bowling & batting. Love to you sir
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 23, 2020
कपिल देव यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉ. अतुल माथुर आणि त्यांची टीम कपिल देव यांची चौकशी करत आहेत. त्यांना लवकरच डिसचार्ज देण्यात येणार असल्याचं डॉक्टकरांनी सांगितले आहे.