मोहित मारवाहने श्रीदेवींसाठी लिहला 'हा' खास संदेश

हिंदी सिनेमातील पाहिली सुपरस्टार अभिनेत्री 'श्रीदेवी' काळाच्या पडद्याआड गेली आहे.

Updated: Feb 26, 2018, 09:01 PM IST
मोहित मारवाहने श्रीदेवींसाठी लिहला 'हा' खास संदेश

मुंबई : हिंदी सिनेमातील पाहिली सुपरस्टार अभिनेत्री 'श्रीदेवी' काळाच्या पडद्याआड गेली आहे.

वयाच्या 54 व्या वर्षी अकाली निधन झाल्याने श्रीदेवीचे चाहते आणि बॉलिवूडनेही हळहळ व्यक्त केली आहे.  

लग्नसमारंभासाठी दुबईत 

मोहित मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी परिवारासह दुबईत पोहचल्या होत्या. चार दिवसांपूर्वी त्यांनी लग्नात सहभाग घेतला. लग्न सोहळ्यात डान्सही केला. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसातच श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने कपूर कुटुंबीयाला मानसिक धक्का बसला आहे.  

मोहितची खास पोस्ट 

 

 

You were more than a legend  Your vacuum will always be felt

A post shared by Mohit Marwah (@mohitmarwah) on

 

मोहितने इंस्टाग्रामवर श्रीदेवींसाठी एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने तुझी पोकळी कायम राहील अशा प्रकारचा एक संदेश आणि फोटो शेअर केला आहे. 

श्रीदेवींचा मृत्यू कशामुळे ? 

सुरूवातीला कार्डीएक अरेस्टमुळे श्रीदेवींचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनुसार टबबाथमध्ये पडून आणि बुडून मृत्यू झाल्याचे कारण देण्यात आले आहेत. सोबतच श्रीदेवीच्या रक्तात दारूचा अंश असल्याची माहितीदेखील पुढे आली आहे.  त्यामुळे श्रीदेवींचे मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे.