Sharbani Mukherjee Then and Now: बऱ्याच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या चित्रपटाची लोकप्रिता आजही कायम आहे. (India Pakistan) भारत- पाकिस्तान युद्ध, त्याभोवती फिरणारं कथानक आणि सैनिकांच्या आयुष्यावर या (Bollywood) बॉलिवूडपटातून प्रकाश टाकण्यात आला होता. आजही Border ची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटातील कलाकार आजही समोर आले, तरी त्यांच्या चित्रपटातील भूमिका आठवतात. पण, चित्रपटातील एक अभिनेत्री अशीही आहे जी तुमच्या बाजुला येऊन उभी राहिली तरी तुम्ही तिला ओळखूच शकणार नाही.
ही अभिनेत्री आहे, शरबानी मुखर्जी (Sharbani Mukherjee). 'ऐ जाते हुए लम्हों, जरा ठहरो जरा ठहरो...', हे गाणं आणि सुनील शेट्टी- शरबानीची केमिस्ट्री चित्रपटाचा उल्लेख होताच चाहत्यांच्या डोळ्यांसमोर येते. निळे डोळे, उजळ कांती आणि निरागस भाव.... असं तिचं सौंदर्य.
शरबानीच्या (wikipedia) विकीपीडियावर नजर टाकल्यास, 2017 मध्ये ती अखेरची एका मल्याळम चित्रपटात झळकली होती. पण, त्यानंतर मात्र ती रुपेरी पडद्यापासून दूर गेली. 'बॉर्डर' चित्रपटानंतर तिला चित्रपटाच्या बऱ्याच संधी मिळाल्या पण, फारसं यश मिळालं नाही.
25 वर्षांनंतर आज शरबानीला पाहिलं, तर ती शेजारी येऊन उभी राहिली तरी ओळखणं शक्य नाही. कारण, तिच्यामध्ये बरेच बदल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो पाहून हे लगेचच लक्षात येत आहे. तुम्हाला माहितीये का, काजोल आणि राणी मुखर्जी यांची चुलत बहिण आहे. तिथे बहिणी लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच इथे शरबानी मात्र अपयशाचा सामना करत राहिली.