'बदला' सिनेमाने पहिल्याच दिवशी जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

'बदला' सिनेमाने 'पिंक' सिनेमाला मागे टाकले आहे.

Updated: Mar 9, 2019, 04:54 PM IST
'बदला' सिनेमाने पहिल्याच दिवशी जमवला एवढ्या कोटींचा गल्ला title=

मुंबई : जेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'बदला' सिनेमा बॉक्स ऑफिसरवर चांगलीच कामगिरी करताना दिसत आहे. 'पिंक' सिनेमात सुद्धा दोघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. पण 'बदला' सिनेमाने 'पिंक' सिनेमाला मागे टाकले आहे. चाहत्यांनी आणि समीक्षकांनी प्रेक्षकांनी सिनेमाचे गोड कौतुक केले आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केला. सिनेमाने पहिल्याच दिवशी 5.04 कोटी रूपयांची मजल मारली आहे. 

'माफ कर देना हर बार सही नहीं होता' अशी टॅग लाइन असलेला 'बदला' सिनेमा गौरी खान, सुनीर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी 'रेड चिली एन्टरटेन्मेट' बॅनरखाली निर्मित केला आहे. 'बदला' सिनेमा 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'कॉन्ट्राटिएम्पो' या स्पॅनिश सिनेमाची रिमेक आहे. सिनेमात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसत असून अभिनेत्री अमृता सिंग सुध्दा मुख्य भूमिकेत झळकत आहेत. 

सिनेमात अमिताभ बच्चन हे बादल गुप्ताची भूमिका साकारत आसून तापसी नयना सेठीच्या भूमिकेत दिसत आहे. हॉटेलमध्ये नयना तिच्या प्रियकराच्या मृतदेहासोबत बंद खोलीत आढळते. तेव्हा नयना स्वत:ला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी एका प्रतिष्ठित वकिलाची निवड करते. तर या वकिलाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन झळतक आहेत. तर एका रहस्यमय घटनेवर आधारित सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.