मुंबई : अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू स्टारर 'मिशन मंगल' चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. सलग चढत्या क्रमावर असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाने अभिनेता जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' चित्रपटाला मागे टाकले आहे. स्वातंत्र दिनाच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर धडकलेल्या दोन्ही चित्रपटांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. पण या टक्करमध्ये अक्षयच्या 'मिशन मंगल'ने बाजी मारली आहे. अर्थात अक्षयचं मिशन अखेर पूर्ण झाल्याचे दिसत आहे.
'मिशन मंगल' चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार करत तब्बल ११४.३९ कोटींची रेकोर्ड ब्रेक कमाई केली आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
#MissionMangal is trending very well on weekdays... Should comfortably cross ₹ 127 cr in *extended* Week 1... Will challenge *lifetime biz* of #Kesari in Week 2... Thu 29.16 cr, Fri 17.28 cr, Sat 23.58 cr, Sun 27.54 cr, Mon 8.91 cr, Tue 7.92 cr. Total: ₹ 114.39 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 21, 2019
तर दुसरीकडे मात्र, जॉनच्या वाट्याला निराशा आली आहे. 'मिशन मंगल'च्या कथे पुढे 'बाटला हाऊस' चित्रपट फेल ठरला आहे. तरण आदर्श यांच्या ट्विट नुसार चित्रपटाने आतापर्यंत फक्त ५७.८२ कोटींचा गल्ला जमा केला आहे.
#BatlaHouse is steady on weekdays... With no major opposition next week [till #Saaho], should continue to collect well... 15.55 cr, Fri 8.84 cr, Sat 10.90 cr, Sun 12.70 cr, Mon 5.05 cr, Tue 4.78 cr. Total: ₹ 57.82 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 21, 2019
आता येत्या दिवसांमध्ये 'मिशन मंगल' चित्रपट किती कमाई करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मिशन मंगलमध्ये अक्षय कुमार इस्रो वैज्ञानिक 'राकेश धवन' ही व्यक्तीरेखा साकारत आहे. तर, विद्या बालन (तारा शिंदे), तापसी पन्नू (कृतिका अग्रवाल), नित्या मेनन (वर्षा पिल्लई), शरमन जोशी (परमेश्वर नायडू) आणि अनंत अय्यर (एचजी दत्तात्रेय) या कलाकरांच्याही अभिनयाची आणि त्यांनी साकारलेल्या पात्रांची जोड मिळाली आहे.