पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर ठरला 'वॉर'

अभिनेता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफची जुगलबंदी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

Updated: Oct 3, 2019, 01:36 PM IST
पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर ठरला 'वॉर' title=

मुंबई : एकेकाळी हृतिकचा शिष्य असलेला टायगर कशा प्रकारे आपल्या गुरूंच्या म्हणजेच हृतिकच्या विरेधात उभा राहतो. याचा प्रत्यय 'वॉर' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षक अनुभवत आहेत. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर 'वॉर' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफची जुगलबंदी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ५३.३५ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. 

'कलंक', 'साहो', 'मिशन मंगल', 'भारत' या चित्रपटांचा विक्रम मोडत 'वॉर' चित्रपट पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत सामाविष्ट झाला आहे. प्रसिद्ध ट्रेंड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. 

'वॉर' चित्रपट जवळपास ३ हजार ८०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'खालीद कभी मेरा स्टूडंट हुआ करता था, अब उसे लगता हैं की वो अपने टिचर से आगे चला गया हैं...' अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' येत्या काळात किती कोटींपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x