राखी सावंतच्या शॉर्ट ड्रेसिंगमुळे बॉयफ्रेंड आदिल खानला त्रास! राखी पूर्ण करू शकेल का ही मागणी?

बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत सध्या तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल खानमुळे चर्चेत आहे. 

Updated: May 28, 2022, 09:19 PM IST
राखी सावंतच्या शॉर्ट ड्रेसिंगमुळे बॉयफ्रेंड आदिल खानला त्रास! राखी पूर्ण करू शकेल का ही मागणी? title=

मुंबई : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत सध्या तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल खानमुळे चर्चेत आहे. राखी सावंतला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केल्यानंतर आदिलने आता तिला दुबईत एक आलिशान घर विकत घेतल्याचं बोललं जात आहे. राखी सावंतला मिळणाऱ्या आनंदादरम्यान बॉयफ्रेंडसाठी तिच्या काही निर्णयांशी तडजोड करावी लागू शकते. आदिलला राखी सावंतचा शॉर्ट ड्रेस घालणं आवडत नाही. अभिनेत्रीने चांगले आणि जास्त झाकलेले कपडे घालावेत अशी त्याची इच्छा आहे.

राखीच्या कपड्यांबाबत समस्या आहे
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा तिचा बॉयफ्रेंड आदिल खानमुळे प्रकाशझोतात आली आहे. राखी आदिलबद्दल काही ना काही शेअर करत असते. नुकतंच राखीनं सांगितलं की, आदिलने तिच्यासाठी बीएमडब्ल्यू खरेदी केली आहे आणि त्याशिवाय आदिलने दुबईत तिच्या नावावर घर विकत घेतलं आहे. राखीचा बॉयफ्रेंड आदिलला तिच्या ड्रेसिंगचा त्रास होतो त्यामुळे राखीने व्यवस्थित कपडे घालावेत अशी आदिलची इच्छा आहे.

'राखीने असे कपडे घालावेत जे...'
एका वृत्तानुसार, राखीचा बॉयफ्रेंड आदिलने मीडियाला सांगितलं की, "मला वाटतं राखीने कमी ग्लॅमरस आणि जास्त झाकलेले कपडे घालावेत." त्याचबरोबर राखीने हे देखील सांगितलं की, दोघंही या नात्याबद्दल किती गंभीर आहेत याचबरोबर तिने आदिलची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली.

आदिलने मात्र आपल्या घरच्यांचा काहीसा विरोध असल्याचं सांगितलं पण राखीने तिचा भूतकाळ सांगितल्याबद्दल त्यांनी तिचं कौतुकही केलं.  राखी याआधी या नात्याबद्दल चर्चेत आली होती.