Nita Ambani Winter Look: नीता अंबानी यांच्या स्वेटरची किंमत ऐकून थंडीतही येईल घाम, जाणून घ्या कोणत्या कंपनीचा आहे

Nita Ambani Winter Look: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या संचालक नीता अंबानी आपल्या फॅशनेबल लूकमुळेही नेहमीच चर्चेत असतात.

Updated: Feb 1, 2023, 10:48 AM IST
Nita Ambani Winter Look: नीता अंबानी यांच्या स्वेटरची किंमत ऐकून थंडीतही येईल घाम, जाणून घ्या कोणत्या कंपनीचा आहे

Nita Ambani Winter Look: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयपीएलमध्ये रिलायन्सच्या मालकिचा असलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संपूर्ण कारभार नीता अंबानी सांभाळतात. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटबरोबर साखरपुडा (Anant Ambani And Radhika Merchant Engagement) पार पडला. भव्य-दिव्य सोहळ्याबरोबरच नीता अंबानीच्या यांच्या लूकचीही चांगलीच चर्चा झाली होती. 

फॅशनमध्येही नंबर वन
मुलाच्या साखपुडा सोहळ्यात नीता अंबानी यांनी सुंदर आऊटफिट परिधान (Nita Ambani Lifestyle) केला होता. पण या व्यतिरिक्त नीता अंबानी आपल्या फॅशनेबर लुकमुळेही ओळखल्या जातात. सध्या थंडिचा हंगाम सुरु आहे. अशात नीता अंबानी यांचा स्वेटर परिधान केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे. नीता अंबानी यांच्या फॅन पेजवरुन हे फोटो समोर आले आहेत. नीता अंबानी यांच्या लंडन ट्रीपदरम्यानचा हे फोटो आहेत. या फोटोत त्यांचा विंटल लूक (Winter Look) पाहिला मिळतोय. 

ब्लॅक कलरचा फ्लोरल जम्पर
नीता अंबानी यांचे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या फोटोत त्यांचा फॅशन लूक पाहून लोकं कौतुक करत आहेत. एका फोटोत नीता अंबानी यांनी सफेद शर्ट परिधान केला आहे, यावर ब्लॅक कलरचा फ्लोअर टीशर्ट परिधान केला आहे. महागड्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या Dolce & Gabbana या कंपनीचा हा जम्पर आहे. पण याची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या राऊंडनेक टीशर्टची किंमत तब्बल 84,603 रुपये इतकी आहे. 

लाखो रुपयांचा फर कोट
दुसऱ्या एका फोटोत नीता अंबानी खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांनी करड्या रंगाचा फर कोट परिधान केला आहे. त्यांच्या विंटर लूक खूपच आकर्षक दिसत आहे. फर कोटसाठी प्रसिद्ध असलेल्या चिंचिल्ला (Chinchilla Fur Coat) या कंपनीचा हा फर कोट आहे. या कोटला Yues Salomon असं म्हटलं जातं आणि याची किंमत ऐकली तर थंडीतही घाम फूटेल. या फर कोटची किंमत जवळपास 21 लाख इतकी आहे. 

नीता अंबानी यांचं विंटर कलेक्शन
नीता अंबानी यांच्या विंटर कलेक्शनवर फॅन्सने अनेक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्या कपड्यांचा लूक आणि त्याची किंमत ऐकून फॅन्स आश्चर्य व्यक्त करतायत. नीता अंबानी आपल्या स्टाइल स्टेटमेटसाठी ओळखल्या जातात. नीता अंबानी या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या (Dheerubhai Ambani International School) फाऊंडर आहेत.