close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कॅन्सरशी झुंज दिलेली अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यामातून मागतेय काम

कलाविश्वातील अनेकांना संबोधून त्यांनी लिहिलं.... 

Updated: Jul 3, 2019, 02:06 PM IST
कॅन्सरशी झुंज दिलेली अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यामातून मागतेय काम
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बऱ्याच दिवसांपूर्वी ‘साहेब बिवी और गँगस्टर ३’ या चित्रपटातून झळकलेल्या अभिनेत्री नफिसा अली सोढी रुपेरी पडद्यापासून दूर होत्या. कर्करोग म्हणजेच कॅन्सच्या आजाराशी सामना करत त्यावर त्या उपचार घेत होत्या. या आजारातून पूर्णपणे बाहेर आल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा या कलाविश्वात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याप्रमाणेच एक पोस्ट लिहित या कलाविश्वात काम मागितलं आहे. 

पोर्टफोलिओप्रमाणे अतिशय प्रभावी असा वाटणारा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं, ‘मी नफिसा अली सोढी... मला भारतीय चित्रपटसृष्टीत काही मोहक भूमिका साकारायला आवडतील. एक वरिष्ठ अभिनेत्री म्हणून मी चांगल्या संहितेच्या (स्क्रिप्टच्या) प्रतिक्षेत आहे. कारण मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहेत. 

देवानेआपल्या सर्वांनाच स्वप्नांचा पाझलाग करण्याची ताकद द्यावी, असं म्हणत तरुण मुलींवर निशाणा साधणं थांबवा असं, आवानही त्यांनी केलं. भारतातील विविधता अधेरेखित करत हा गुण आपण जपला पाहिजे असा आग्रह त्यांनी केला. शिवाय फूट पाडण्याच्या या तंत्राला थांबवत एका चांगल्या विश्वसाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे असा संदेशही त्यांनी दिला. नफिसा यांच्या पोस्टमधील ही वाक्य अभिनेत्री झायरा वसिमसाठी असल्याचं काहींचं म्हणणं आहे.

एका मुलाखतीतही नफिसा यांनी कलाविश्वात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘मला आता फार बरं वाटत आहे. मला कॅन्सर नसल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे आताच्या क्षणाला मला हा आनंद आणि हे जगणं साजरा करायचं आहे. माझ्या आयुष्याचा प्रवास साजरा करायचा आहे. मला या कलाविश्वाचा पुन्हा एकदा एक भाग होण्यास आवडेल’, असं त्या म्हणाल्या होत्या. 

साधारण वर्षभरापूर्वी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारे एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आपण चांगल्या भूमिकांच्या शोधात असल्याचं म्हणत कलाविश्वात कामासाठीची जाहीर विचारणा केली होती.