Cannes च्या रेड कार्पेटवर 'तो' दीपिकाला Kiss करत राहिला, ती हात हटवत राहिली...

दीपिका जेव्हा जेव्हा रेड कार्पेटवर आली, तेव्हा तेव्हा प्रत्येक क्षणी तिच्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या. 

Updated: May 23, 2022, 08:26 AM IST
Cannes च्या रेड कार्पेटवर 'तो' दीपिकाला Kiss करत राहिला, ती हात हटवत राहिली...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Deepika Padukone Cannes Video: अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. विविध लूक्समध्ये दीपिका जेव्हा जेव्हा रेड कार्पेटवर आली, तेव्हा तेव्हा प्रत्येक क्षणी तिच्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या. दीपिकाचा असाच एक रेड गाऊन लूक सध्या बराच चर्चेत आहे. 

फक्त लूकच नव्हे, तर ती या लूकमध्ये रेड कार्पेटवर आली, तो क्षणही जरा जास्तच चर्चेत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे 'तो' एक क्षण. (deepika padukone video viral )

कान्समध्ये दीपिका सध्या ज्युरी म्हणून हजेरी लावत होती. त्याचवेळी एके दिवशी दीपिका रेड कार्पेटवर आली आणि तिथे तिच्यासोबत जे घडलं त्याचा विचार कुणीही केलाच नसावा. 

रेड कार्पेटवर तिनं प्रवेश केला आणि त्याचवेळी ती फोटोसाठी पोझ देताना तिथं एक व्यक्ती आला आणि दीपिकाला काही कळण्याच्या आतच त्याने तिला मिठी मारण्यास सुरुवात केली. 

एका व्यक्तीनं आपल्याला मिठी मारताच दीपिकालाही काहीसा संकोचलेपणा वाटला. पण तिनं ही परिस्थिती सुरेखरित्या हाताळली. काही क्षणांना ती त्या व्यक्तीचा हात आपल्या कमरेवरून हटवताना दिसली. पण, तो व्यक्ती मात्र दीपिकाला गालावर किसच करताना दिसला. 

सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा हा व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. ज्यासाठी तिनं लाल रंगाचा स्ट्रॅप, फुल लेंथ गाऊन घातला होता. यावेळी तिनं वेट हेअरस्टाईलला प्राधान्य दिलं होतं. गळ्यातला हिऱ्यांचा हार तिच्या लूकला चार चाँद लावत होता.