मिथुन चक्रवर्तींसंदर्भातील 'ही' माहिती तुम्हाला देईल धक्का

हे असंही होऊ शकतं.... हीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.     

Updated: Sep 1, 2021, 05:11 PM IST
 मिथुन चक्रवर्तींसंदर्भातील 'ही' माहिती तुम्हाला देईल धक्का title=
मिथुन चक्रवर्ती

मुंबई : काही कलाकारांना त्यांचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी फार आटापिटा करावा लागत नाही. जीवनातील निर्णयांपासून ते व्यक्ती म्हणून समाजात असणारं त्यांचं स्थानच सारंकाही सांगून जातं. 

ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती  (mithun chakraborty ) हे अशाच सेलिब्रिटींच्या यादीतलं एक नाव. चित्रपटातील नृत्य शैली असो किंवा मग त्यांचा स्वभाव, मिथुनदा कायमच जिथं जातत तिथे आपली छाप सोडतात. सध्या असंच काहीसं झालं आहे. पण, यावेळी मिथुन दा यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. कारण, जे त्यांनी केलं आहे तसं फार क्वचितच घडताना दिसतं. परिणामी हे असंही होऊ शकतं.... हीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. 

मोठे मोठे अभिनेते, सेलिब्रिटी सहसा चित्रपट किंवा इतर प्रकल्पांमध्ये अतिशय व्यस्त असतात आणि ते त्याच्यासाठी मानधन म्हणून भली मोठी रक्कम आकारतात. याला अपवाद ठरतात ते म्हणजे काही प्रसंग. जिथं हे मोठे सेलिब्रिटी त्यांच्या मानधनात कपातही करतात. हे तेव्हाच घडतं, जेव्हा कलाकारांच्या मनाच्या जवळची एखादी गोष्ट घडते. 

काळा टीक्का न लावल्यानं कोरोनाचा संसर्ग; दिग्दर्शिकेचा अजब दावा

 

अभिनेते मिथुन चक्रवर्ती, लवकरच 'चीकू की मम्मी दूर की' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याआधीच या मालिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या मालिकेच्या प्रोमोची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या कारकिर्दीतील गतकाळचे दिवस आठले आणि ते चीकूशी खूप भावनिकपणे जोडले गेले. भावनांचं उधाण आल्यामुळं अखेर त्यांनी आपल्या मानधनाचा आकडा कमी केला.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by StarPlus (@starplus)

मिथुन दांच्या स्ट्रगलप्रमाणेच मेहनत करुन यश मिळवण्याची इच्छा असलेल्या चीकूच्या संघर्षमय प्रवासाचं चित्रण या मालिकेत करण्यात आलं आहे. 6 सप्टेंबर 2021 पासून ही मालिका स्टार प्लस वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.