मुंबई : चित्रपटांमधील कलाकारांना अप्रतिम लुक देण्यात मेकअपचा मोठा हात असतो. पण कधी-कधी हा मेकअप एखाद्याला इतका धोकादायक बनवू शकतो की, हॉस्पिटलमध्येही दाखल व्हावं लागतं. नुकतंच एका अभिनेत्रीसोबत असंच काहीसा प्रकार घडलाय. चित्रपटात रोल करण्यासाठी, अभिनेत्रीने प्रोस्थेटिक्स मेकअप केला, त्यानंतर तिला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.
यानियाचं भूत पात्र
'छोरी' चित्रपटात अभिनेत्री यानिया भारद्वाजने छोटी माईची भूमिका साकारली होती. चित्रपटात यानियाला भुताचा लूक देण्यासाठी प्रोस्थेटिक्सचा वापर करण्यात आला आणि त्यामुळे तिची तब्येत इतकी बिघडली की तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. चित्रपटातील तिच्या परिवर्तनाबद्दल यानियाने सांगितले की, प्रोस्थेटिक्स करायलाकिमान तीन ते चार तास घालवायला लागयचे. आणि हा मेकअक उतरवायलाही दोन तास लागायचे. मला बाकीच्यांपेक्षा खूप आधी सेटवर पोहोचायला लागायचं.
खायला व्हायचा त्रास
यानियासाठी भूताचे रूप साकारणं हा खूप कठीण प्रवास होता. यानिया सांगते की, हा लूक खूपच अवघड होता. स्क्रीनवर दिसते त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण. अंगावर घेतल्याने त्रास भरला होता. माझ्यासाठी ते एक वॅक्सिंग अनुभवासारखं होतं. ते काढताना पोटाभोवतीचे छोटे केस बाहेर यायचे. कधी पुरळ यायचा तर कधी त्यातून रक्त यायला लागायचं. माझे हात आणि चेहरा प्रोस्थेटिक्सने झाकलेला होता. मला जेवताही येत नव्हतं. मला रोज वेदनाशामक औषधे घ्यावी लागत होती. कधी कधी ताप यायचा.
फुफ्फुसांना सुज
यानिया भारद्वाज पुढे म्हणाली की, माझ्या फुफ्फुसात सूज आली होती, त्यामुळे मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. खूप कमी लोकांना प्रोस्थेटिक्स करून घेण्याची संधी मिळते आणि मी त्यापैकी एक होते. मी स्वतःला भाग्यवान समजते. सिने जगात प्रोस्थेटिकचा अर्थ असा नाही की, तुम्ही कसे दिसता, त्यात तुम्ही कसे वागाल हे महत्त्वाचं आहे. मला माहित नव्हतं की प्रोस्थेटिक माझं शरीर आणि आरोग्य खराब करेल. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मी काहीही खाऊ शकले नाही. मी काहीही पिऊ शकत नव्हते, कारण जे काही खाणेपिणे होतं ते सगळं शरीरातून बाहेर पडत होतं. मला कोशिंबीरही पचत नव्हती.