प्रसिद्ध कोरियोग्राफरचा पत्नीसोबत रोमान्स, बेडरूमधील 'तो' व्हिडीओ समोर

पुनती आणि त्याच्या पत्नीच्या या व्हिडीओची का होतेय चर्चा पाहा व्हिडीओ

Updated: Oct 7, 2021, 04:07 PM IST
प्रसिद्ध कोरियोग्राफरचा पत्नीसोबत रोमान्स, बेडरूमधील 'तो' व्हिडीओ समोर title=

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर पुनीत पाठकचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओनं काहीशी खळबळही उडाली आहे. आपल्या कामाशी तो खूप प्रामाणिक असतो. सध्या त्याच्या पत्नीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पुनीत पाठक पत्नीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून पुनीतचे चाहते हैराण झाले आहेत.

नुकताच बिग बॉस कंटेस्टंटने लिपलॉकचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता पुनीतचा हा बेडरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. पुनीतच्या पत्नीने रोमान्स करतानाचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला. हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांनी आश्चर्यही वाटलं आहे. गेल्या काही दिवसांत असे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करण्याचा ट्रेन्ड आला आहे. 

पुनीतची पत्नी निधी मुनी सिंग सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर असा व्हिडिओ शेअर केला की तो वेगानं व्हायरल झाला. त्याच सोबत या व्हिडीओची चर्चाही होत आहे. 

पुनीत आणि निधी गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकले होते. पुनीत आणि निधी 'झलक दिखला जा' सेटवर पहिल्यांदा भेटले होते. तिथून त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. ऑगस्ट 2020मध्ये त्यांनी साखरपुडा केला. त्यानंतर 11 डिसेंबर 2021 रोजी दोघंही विवाहबंधनात अडकले.

पुनीतच्य़ा करियरची सुरुवात डांसर डांस बेस्ड रियलिटी शोपासून झाली होती. डान्स बेस्ड रियलिटी शो आणि सिनेमातून पुनीत दिसत असतो. 'खतरों के खिलाड़ी' कार्यक्रमातही पुनीत सहभागी झाला होता. एबीसीडी, एबीसीडी 2 सारख्या सिनेमात पुनीतने काम केलं आहे.