हाफ हनीमुनसाठी बांगलादेशला गेले अन्..., चंकी पांडेनं सांगितला अनन्याच्या जन्माचा किस्सा

Ananya Panday's Birthday and Bangladesh Connection : अनन्या पांडेच्या जन्माचं आणि बांगलादेशचं आहे खास कनेक्शन...

दिक्षा पाटील | Updated: Dec 7, 2024, 02:19 PM IST
हाफ हनीमुनसाठी बांगलादेशला गेले अन्..., चंकी पांडेनं सांगितला अनन्याच्या जन्माचा किस्सा
(Photo Credit : Social Media)

Ananya Panday's Birthday and Bangladesh Connection : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेनं त्याच्या करियरमध्ये आजवर अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं आहे. पण त्याचं करिअर हे त्या सगळ्या कलाकारांसारखं झालं नाही. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही त्याला तितकं यश मिळालं नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं खुलासा केला की बांगलादेशमध्ये त्याला सगळ्यात जास्त आनंदाची बातमी मिळाली. याविषयी स्वत: चंकी पांडेनं मुलाखतीत सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

'ब्रूट'ला दिलेल्या मुलाखतीत चंकी पांडेनं त्याला आलेल्या या सगळ्या स्ट्रगलविषयी सांगितलं आहे. त्यानं यावेळी सांगितलं की बांगलादेशमध्ये पाच वर्ष यशस्वी अभिनेता म्हणून का केलं. अनेक हिट चित्रपट दिले, अचानक त्याला काम मिळणं बंद झालं. त्यानंतर मी अनेक हिरो असतील असे चित्रपट करु लागलो, पण त्यामुळे मला दु:खी झालो. मला काही कळत नव्हतं की इथे काय करतो, त्यामुळे मी बांगलादेशमध्ये काम करण्याचं ठरवलं. तिथे पाच वर्ष काम केलं आणि सगळ्यांची मने जिंकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे चंकी पांडे म्हणाला की 'त्यानं 1998 मध्ये भावनाशी लग्न केलं. तेव्हा तो बांगलादेशमध्येच काम करत होता. त्यानं हसत मस्करीकरत सांगितलं की त्यानं तिथे अर्ध हनीमून केलं, कारण त्याला एक चित्रपट पूर्ण करायचा होता. मला वाटतं की अनन्याचा जन्म देखील बांगलादेशमध्येच झाला.'  

चंकी पांडेनं पुढे सांगितलं की 'भावनाच्या सांगण्यानं तो बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईत परतला होता. त्यासोबत त्यानं या गोष्टीचा खुलासा केला की त्याच्या मुलींचा जन्म (अर्थात भावना गर्भवती राहिली) झाल्यानंतर त्याच्या करिअरची एक वेगळी सुरुवात झाली.' 

हेही वाचा : कॉन्सर्टमध्ये रडणाऱ्या व्हायरल गर्लला दिलजीतने खरंच दिली 2.5 कोटींची कार? सत्य काय?

चंकी पांडेनं 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला ‘विश्वात्मा’ आणि ‘आंखें’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्याला यश काही मिळालं नाही आणि हे पाहता तो बांगलादेशला परतला. तिथे गेल्यानंतर चंकी पांडे हा तिथल्या इंडस्ट्रीमध्ये काम शोधू लागला होता. त्यानं तिथे खूप काम केलं. त्याच्या कामानं त्यानं सगळ्यांची मनें जिंकली. अशात तो बांगलादेशचा सुपरस्टार ठरला होता. त्यानंतर चंकी पांडेनं 1993 मध्ये गोविंदासोबत आंखे या चित्रपटात काम केलं. या चित्रपटातून त्या दोघांची जोडी ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. 

About the Author