टीम 'सर्किट' झळकली आयपीएलच्या प्री मॅच सेशनमध्ये

आयपीएलचा फिवर सुरू झाला आहे. आयपीएलचा १६ वा सीझन सुरु आहे. अशातच अनेक कलाकारही तिथे सामना पहायला पोहचताच. 

Updated: Apr 2, 2023, 06:54 PM IST
टीम 'सर्किट' झळकली  आयपीएलच्या प्री मॅच सेशनमध्ये title=

मुंबई : रंगारंग कार्यक्रमानंतर आता आयपीएलच्या सामन्यांना धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. यंदाच्या या 16 वा हंगामात 10 संघ आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. चेन्नई आणि गुजरात यांच्यात झालेल्या सामन्यानंतर थरारक अंदाजात आयपीएलला सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. वैभव आणि हृता दोघंजण 'सर्किट' सिनेमातून पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. 

आयपीएलचा फिवर सुरू झाला आहे. आयपीएलचा १६ वा सीझन सुरु आहे. अशातच अनेक कलाकारही तिथे सामना पहायला पोहचताच. असंच काहीसं मराठी सिनेमाबाबत पाहायला मिळालं. सध्या सगळीकडेच "सर्किट" या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आयपीएल आणि टीम "सर्किट" एकत्र आले ते प्री मॅच सेशनमध्ये. 

या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचं आयपीएलमध्ये प्रमोशन झालं हे विशेष. या सिनेमात अभिनेता वैभव तत्ववादी आणि  हृता दुर्गुळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सध्या या सिनेमाचं प्रमोशनही जोरदार सुरु आहे. वैभव आणि हृताची जोडी मोठ्या पडद्यावर एकदम फ्रेश दिसत आहे.
 
"सर्किट" चित्रपटातील अभिनेता वैभव तत्ववादी, अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या मॅचपूर्वी माजी क्रिकेटपटू किरण मोरे आणि पूर्वी भावे यांच्याशी क्रिकेट, सर्किट चित्रपटाविषयी संवाद साधला. या गप्पांतून किरण मोरे यांनी वैभव, हृता आणि माझ्यात एक साम्य असल्याचं सांगितलं. ते साम्य म्हणजे, तिघांचाही वाढदिवस एकाच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये असतो. चित्रपटाविषयी रंगलेल्या गप्पांसह सर्किटचा ट्रेलरही दाखवण्यात आला. वैभव तत्त्ववादीनं लाईव्ह मॅचसाठी कॉमेंट्रीही केली.  सर्किट सिनेमाच्या टिझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून त्यावर नेटकरी आणि त्यांचे चाहते कमेंट करत आहेत. 

आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवरील अनुभवाविषयी वैभव आणि हृता म्हणाले, की सुरुवातीला खरंच थोडे दडपण होते, पण हा अनुभव खरंच कमालीचा आणि सदैव लक्षात राहील असा होता. सर्किटचा ट्रेलर सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. या दोघांचा सिनेमात एकदम वेगळाच अंदाज दिसला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर सादर करेल. ट्रेलरच्या मध्यभागी वाजणारे पार्श्वसंगीत देखील अप्रतिम आहे.