महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात पर्यटकांची लाट! इथ असं आहे तरी काय?

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळ हाऊसफुल्ल झाली आहेत. मात्र, दोन जिल्हयांमध्ये पर्यटकांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळत आहे.  जाणून घेऊया हे दोन जिल्हे कोणते? 

वनिता कांबळे | Updated: Dec 29, 2024, 09:29 PM IST
महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात पर्यटकांची लाट! इथ असं आहे तरी काय?  title=

Maharashtra Tourist Places Crowded For Thirty First And New Year : थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पर्यंटकांची पावलं आता पर्यटनस्थळाकडे वळू लागली आहेत. कुटुंबासोबत अनेक जण फिरायला निघाले आहेत. त्यामुळे कोकणासह महाराष्ट्रातील पर्यटनस्थळ सध्या पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील रायगड आणि सातारा जिल्हायत पर्टकांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे. 

हे देखीस वाचा.... मुंबईतील छुपे समुद्र किनारे; इथं जाण्यासाठी पैसा नाही तर फक्त जोडीदाराची सोबत पाहिजे, शांत, निवांत...

नारळी पोफळीच्या बागा...रूपेरी वाळू... निळाशार समुद्र आणि फेसाळणार्‍या लाटा. यामुळं रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांचं फेव्हरेट डेस्टीनेशन ठरतंय....नाताळसारखी सुटी म्हटली की मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडातील या किनार्‍यांकडे पर्यटकांची पावलं आपोआप वळतात. गेल्या दोन दिवसात अलिबाग, काशिद , मुरूड दिवेआगर हरिहरेश्‍वरच्या किनार्‍यांवर 35 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिलीय. सागरी पर्यटनाबरोबर दक्षिण काशी अशी ओळख असलेल्‍या हरिहरेश्‍वर इथं दर्शनाची संधी पर्यटक साधताना दिसताहेत.

इथल्या समुद्राचा मनसोक्त आनंद लुटण्यासोबतच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्टसचाही पर्यटक आनंद घेत आहेत. घोडा आणि उंटांच्या सवारीमुळे बच्चे कंपनीसाठी साहसी खेळांची रेलचेल आहे. इथून पाय निघत नाही असं पर्यटक सांगतात. पर्यटकांच्या वर्दळीनं किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बूकिंग फूल झालंय. या पर्यटकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी स्‍थानिक प्रशासनाकडून घेतली जातेय. ही संधी साधून ठिकठिकाणी महोत्सवांचही आयोजन करण्यात आलं आहे. मिनीगोवा म्हणून नावारूपाला आलेल्या रायगडच्या समुद्र किनार्‍यांवर पर्यटकांची ही रेलचेल नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत अशीच कायम राहणार आहे.

रायगडप्रमाणेच साता-यालाही पर्यटक पसंती देत आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर पर्यटकांनी गजबजून गेलंय. महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या पॉईंटवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. वेण्णा लेक इथं पर्यटक बोटिंगचा आनंद घेताहेत.
2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षांच्या स्वागतासाठी पर्यटकांची सर्वत्र रेलचेल पाहायला मिळत आहे. सेलिब्रेशन जरूर करा मात्र आपल्या लहान मुलांची काळजीपण घ्या, असं आवाहनही केलं जातंय.