PHOTOS : भेटा मिस्टर आणि मिसेस कपिल शर्माला

विनोदवीर कपिल शर्मा सध्याच्या घडीला त्याच्या आयुष्यात दोन नव्या प्रवासांना सुरुवात करत आहे. बराच काळ कलाविश्वापासून दूर राहिल्यानंतर अखेर तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज आहे. पण, त्यासोबतच सर्वांना खळखळून हसवणाऱ्या कपिलने त्याच्या खासगी आयुष्यालाही प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

Updated: Dec 13, 2018, 02:17 PM IST
PHOTOS : भेटा मिस्टर आणि मिसेस कपिल शर्माला

मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा सध्याच्या घडीला त्याच्या आयुष्यात दोन नव्या प्रवासांना सुरुवात करत आहे. बराच काळ कलाविश्वापासून दूर राहिल्यानंतर अखेर तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज आहे. पण, त्यासोबतच सर्वांना खळखळून हसवणाऱ्या कपिलने त्याच्या खासगी आयुष्यालाही प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

अतिशय बिकट परिस्थितीत आणि प्रत्येक चढ उतारात साथ देणाऱ्या गिन्नी छतरथ हिच्यासोबत कपिलने लग्नगाठ बांधली आहे. जालंधरमध्ये त्यांचा विवाहसोहळा पारंपरिक शीख रुढी, परंपरांनुसार पार पडला. कपिल आणि गिन्नी गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. किंबहुना काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यात एक वादळ आल्याच्याही चर्चा होत्या पण, या साऱ्या चर्चांना शह देत अखेर या जोडीने सहजीवनाची शपथ घेतली.

 
 
 
 

A post shared by The Kapil Sharma Show 2 (@kapilsharmashow2) on

अस्सल पंजाबी पद्धतीने सर्व चालीरितींसह गिन्नी आणि कपिलचं लग्न पार पडलं. यावेळी दोघांनीही लाल आणि हिरव्या रंगाच्या रंगसंतीतील पेहरावाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. हिरव्या रंगाची शेरवानी आणि त्यावर सोनेरी जर, हातात तलवार, डोक्यावर पगडी अशा एकंदर महाराजा लूकमध्ये कपिल अतिशय रुबाबदार दिसत होता. तर गिन्नीसुद्धा लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये त्याला शोभून दिसत होती.

 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

कपिलने सोशल मीडियावर गिन्नीसोबतचा एक सुरेख फोटो शेअर करत जणू मिस्टर आणि मिसेस कपिल शर्मा यांची पहिली झलक सर्वांसमोर आणली. इथे अनेक फॅन पेजवरुनही त्यांच्या लग्नातील फोटो पोस्ट करण्यास सुरुवात झाली. टेलिव्हिजन आणि विनोदी कार्यक्रमांच्या विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या कपिलला शुभेच्छा देण्यासाठी भारती सिंग, कृष्णा अभिषेकही पोहोचले होते. चाहत्यांनीही या नवविवाहित दाम्पत्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.