कलाविश्वाला असा बसतोय Coronaचा फटका; मोठमोठे कलाकारही बेजार

चीन, इटली, इराण या देशांमागोमाग भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. 

Updated: Mar 10, 2020, 02:54 PM IST
कलाविश्वाला असा बसतोय Coronaचा फटका; मोठमोठे कलाकारही बेजार  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : CoronaVirusचा वाढता संसर्ग सध्या संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. चीन, इटली, इराण या देशांमागोमाग भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. परिणामी प्रशासनाकडूनच काही प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. 

सणावारांपासून ते राजकीय मंडळींच्या दौऱ्यांपर्यंतचा प्रत्येक विभाग कोरोनामुळे प्रभावित झाला आहे. याचा फटका आता कलाविश्वाला अर्थात बॉलिवूडलाही बसत आहे. कोट्यवधींची उलथापालथ होणाऱ्या या कलाजगतामध्ये कोरोना व्हायरसची भीती पाहता अनेक चित्रपटाच्यांच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. आदर्श यांनी चित्रपटांच्या नावांचा उल्लेख करणं टाळलं असलं तरीही कोरोनामुळे चित्रपट व्यवसायावर गदा आल्याचाच सूर त्यांनी आळवला. देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाच्या भीतीमुळे प्रेक्षकांनीही चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे संभाव्य अडचणी टाळण्यासाठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी एकमताने हे निर्णय़ घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

अक्षय कुमार, सलमान खान यांचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट, कार्तिक आर्यनचा 'भूलभुलैय्या २' या चित्रपटाच्या चित्रीकरणाची ठिकाणंही बदलण्यात आली आहेत. करम जोहरच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक समजल्या जाणाऱ्या 'तख्त' या चित्रपटाच्या वाटेतही बऱ्याच अडचणी आल्या आहेत. त्यामुळे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीच करणपुढेही हा पेच उभा राहिला आहे. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या भूमिका असणाऱ्या '`८३' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही फार कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. पण, कोरोनाची दहशत पाहता या चित्रपट निर्मात्यांपुढेही हा प्रश्न उभा राहिला असणार यात शंका नाही.