तू चाल गड्या...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांकडून 'सलाम'

कोरोनाशी लढ्यासाठी अत्यावश्यक सेवेत असलेल्या प्रत्येकाला व्हिडिओ समर्पित 

Updated: Apr 13, 2020, 01:49 PM IST
तू चाल गड्या...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांकडून 'सलाम' title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकजण कोरोनाशी लढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. परदेश दौरा करणाऱ्यांपासून सुरू झालेला कोरोना आता कम्युनिटीमध्ये पसरला आहे. असं असतानाही अत्यावश्यक सेवेतील मंडळी कोरोनाशी लढा देत आहेत. देशभरात कोरोनाचे दहा हजारहून अधिक रूग्ण आढळले असून राज्यात हा आकडा दोन हजाराच्यावर गेला आहे. 

असं असलं तरीही कोरोनाशी लढण्यासाठी पोलीसदल, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सुरक्षा रक्षक, शेतकरी, भाजी विक्रेते, अत्यावश्यक सेवा पुरवणारी मंडळी आहेत. या सगळ्यांना मराठी कलाकारांनी 'सलाम' केला आहे. 

'तू चालं पुढं तूला रं गड्या भीती कशाची' हे गाळं पुन्हा एकदा रिक्रिएट करून अत्यावशक सेवेत कार्यरत असणाऱ्यांना समर्पित केलं आहे. हृषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी या गाण्याला वेगळा टच दिला आहे. तर अजय गोगावले, प्रियंका बर्वे आणि दीपिका दातारने यांना गायलं आहे. ही संकल्पना समीर विद्वांस आणि हेमंत ठोमेची आहे. 

या व्हिडिओत अनेक मराठी अभिनेता आणि अभिनेत्रींचा समावेश आहे. प्रत्येक कलाकाराने या व्हिडिओतून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या त्या प्रत्येकाला सलाम केला आहे. आपल्याला माहितच आहे कोरोनामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन हे वाढवण्यात आलं आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. यामुळे आता सगळे कलाकार मंडळी देखील घरी आहेत. हा व्हिडिओ प्रत्येकाने आपापल्या घरी शूट करून पाठवला आहे. यातून त्यांनी घरी राहा आणि काळजी घ्या हा संदेश दिला आहे.