'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. मग ते भजन सम्राट अनूप जलोटा असो किंवा क्रिकेटपटू श्रीशांत असो. 'बिग बॉस'च्या या नव्या पर्वाच्या पहिल्या भागापासूनच या घरातील सदस्यांची खरी बाजू पाहायला मिळाली. क्रिकेटपटू श्रीशांतही एका टास्कमुळे चर्चेचा किंबहुना वादाचा विषय ठरला होता.
अशा या रागरुसव्यांदरम्यानच घरात तिसऱ्या दिवशी त्याने आपल्या कारकिर्दीत अतिशय अडचणीच्या प्रसंगाविषयी भाष्य केलं.
२०१३ मध्ये राजस्थान रॉयल्य या संघाकडून खेळतेवेळी आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयकडून त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती.
'बिग बॉस' १२ मध्ये एलिमिनेशन झोनमध्ये आलेल्या किर्ती वर्माचं सांत्वन करतेवेळी त्यावने आपल्या आयुष्यातील अडचणीच्या काळाविषयी सांगितलं. क्रिकेटच्या मैदानात आपल्याला प्रवेश नसल्याचं सांगत जवळपास गेल्या ५ वर्षांपासून आपण तसं केलंही नसल्याचं श्रीशांतने स्पष्ट केलं.
इतकच नव्हे तर, त्याला कधीच मुलाच्या शाळेत क्रिकेटचं आयोजन केलं असल्यास तेथेही जात नाही.
क्रिकेटमध्ये आजीवन बंदीच्या शिक्षेनंतर श्रीशांतने त्याचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता. तिथे त्याला फारसं यश मिळालं नाही, पण तरीही तो कायमच प्रकाशझोतात मात्र राहिला. तेव्हा आता 'बिग बॉस'च्या घरात त्याला प्रेक्षकांची आणि घरातल्या स्पर्धकांची साथ मिळते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.