Swastika Mukherjee Fake MMS Scandal: 'क्रिमिनल जस्टिस' (Criminal Justice 3) वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जीला (Swastika Mukherjee) आज ओटीटी स्टार म्हणून देखील ओळखलं जातं. अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारलेल्या स्वास्तिकाला क्रिमिनल जस्टिस सीरिजनंतर लोकप्रियता मिळाली. स्वास्तिकाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री जेव्हा प्रेक्षकांच्या समोर येते तेव्हा आपल्या अभिनयाने आणि घायाळ अदांना चाहत्यांना घायाळ करते.
स्वास्तिका आता 'क्रिमिनल जस्टिस' सीरिजनंतर 'कला' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या स्वास्तिका आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेत्री आलेल्या एका अनुभवाबद्दल आणि फेक एमएमएस लीक प्रकरणाबद्दल मोठं वक्तव्य केलं.
एका शोमध्ये स्वास्तिक 'कला' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. (Swastika Mukherjee New Movie) शो दरम्यान अभिनेत्रीने एका सिनेमाबद्दल सांगितलं. ज्यामध्ये तिने एकट्या मद्यधुंद आईची भूमिका साकारली होती. सिनेमात काही रोमांटिक सीन देखील होते.
अभिनेत्रीचे सिनेमातील रोमांटिक सीनच MMS म्हणून इंटरनेटवर प्रदर्शित करण्यात आले. तेव्हा अभिनेत्रीचे नातेवाईकांना देखील MMS सत्य वाटला. म्हणून अभिनेत्रीच्या आई-वडिलांना अनेकांचे फोन यायचे. MMS प्रकरणानंतर अभिनेत्रीचं करियर देखील संपण्याच्या मार्गावर होतं.
MMS व्हिडीओवर आईची प्रतिक्रिया
मुलाखतीत स्वस्तिका मुखर्जीने (Swastika Mukherjee Movies and Tv Shows) एमएमएस स्कँडलवर मोकळेपणाने वक्तव्य केलं. 'MMS व्हिडीओ लीक झाल्यानंतर माझ्या आईला फोन करुन लोक तक्रार करायचे. तू सर्टिफिकेट असलेले सिनेमे करु शकत नाहीस. मद्यधुंद असलेल्या भूमिका तुला का करायाच्या आहेत...' अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या आईने दिली आहे.