Vikram Gokhale : 55 वर्षांची खास मैत्री! विक्रम गोखले यांना घर घेण्यासाठी Amitabh Bachchan यांनी केली मदत

Vikram Gokhale Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात शनिवारी (26 नोव्हेंबर 2022 ) निधन झाले आहे. मुंबईत घर घेण्यासाठी बॉलिवूडचे महानायक यांनी विक्रम गोखले यांना मदत केली होती. 

Updated: Nov 27, 2022, 10:05 AM IST
Vikram Gokhale : 55 वर्षांची खास मैत्री! विक्रम गोखले यांना घर घेण्यासाठी Amitabh Bachchan यांनी केली मदत  title=
amitabh bachchan helped vikram gokhale struggling days and first home in mumbai Vikram Gokhal And Amitabh Bachchan Friendship nmp

Vikram Gokhal And Amitabh Bachchan Friendship : मराठी (Marathi Film Industry) आणि बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांचे सदाबहार अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhal) यांचं पुण्यात 26 नोव्हेंबर 2022 ला निधन झालं. 5 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेता. त्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 

मराठी सिनेसृष्टी असो किंवा बॉलिवूड अनेक कलाकरांनी त्यांचासोबत काम केलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्यांचा आठवणीत रमले आहेत. विक्रम गोखले त्यांचा संघर्षच्या दिवसात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मदत केली होती. 

संकटात Big B यांची साथ 

एवढंच नाही तर त्यांना मुंबईत घर घेण्यासाठी मदत केली होती. खुद्द विक्रम गोखले यांनी हा किस्सा सांगितला होता. जेव्हा विक्रम गोखले मोठ्या आर्थिक समस्येला तोंड देत होते आणि मुंबईत घराचा शोध घेत होते तेव्हा बीग बी त्यांचा मदतीला धावून आले होते. अमिताभ बच्चन यांनी विक्रम गोखले यांच्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना व्यक्तिश: पत्र लिहिले होते. त्यांच्या सांगण्यावरून सरकारकडून विक्रम गोखले यांना घर मिळाले. ते पत्र माझ्याकडे आजही विक्रम गोखले यांच्या घरी फ्रेम करून ठेवण्यात आले आहे. (amitabh bachchan helped vikram gokhale struggling days and  first home in mumbai Vikram Gokhal And Amitabh Bachchan Friendship)

55 वर्षांची खास मैत्री!

अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले हे एकमेकांचे चांगले मित्र होते. 55 वर्षांची ही मैत्री एक उदाहरण आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पुस्तकात विक्रम गोखले यांचा एक महान अभिनेता असा उल्लेख केला आहे. त्यांचा बद्दलची अजून एक गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नाही ती म्हणजे विक्रम गोखले आठवड्यातून एकदा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पाहत असतं. 

विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन यांनी अग्निपथ, खुदा गवाह आणि परवाना यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. तर विक्रम गोखले यांचा याच महिन्यात प्रदर्शित झालेला गोदावरी हा शेवटचा चित्रपट ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी कलाकृतीची दखल घ्यायला लावणाऱ्या या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.