सनीच्या गाण्यावर तरूणींचा धमाल डान्स, व्हिडिओ व्हायरल

अभिनेता संजय दत्त याच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. संजय दत्तचा हा बहुचर्चित सिनेमा २२ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Updated: Sep 12, 2017, 03:18 PM IST
सनीच्या गाण्यावर तरूणींचा धमाल डान्स, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : अभिनेता संजय दत्त याच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. संजय दत्तचा हा बहुचर्चित सिनेमा २२ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

या सिनेमातील सनी लिओनीच्या गाण्याने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सनीचं या सिनेमातील ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ हे गाणं चांगलं लोकप्रिय झालंय. या गाण्याचे तरूणांमध्ये चांगलीच क्रेह बघायला मिळत असून अनेकांनी या गाण्यावरील डान्स व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ प्रशांत तमंग नावाच्या व्यक्तीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलाय. या व्हिडिओत तीन तरुणी एका तरूणासोबत धमाकेदार डान्स करताना बघायला मिळत आहेत. या व्हिडिओला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

हा व्हिडिओ आतापर्यंत १८२,४२८ वेळा बघितला गेलाय आणि यावर अनेक चांगल्या कमेंटही आल्या आहेत. या तरूणींनी सनी लिओनीसारखाच डान्स या व्हिडिओत केल्याने प्रेक्षकांना तो अधिक पसंत पडत आहे.