The Love Life Of Rekha: बॉलिवूडमधील (Bollywood) 80 च्या दशकातील अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर रेखा याचं (Rekha) नाव सर्वात वर येतं. ती एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच पण तिचे सौंदर्यही अतुलनीय आहे. रेखा 68 वर्षाची जरी असली तर तिच्या सौंदर्याने ती सगळ्यांनाच घायाळ करते. वयाच्या या टप्प्यावरही तिचं सौंदर्य आजही अनेकांना घायाळ करतं. फिल्मी करिअरमध्ये (Film career) रेखाचं (Rekha) नाव अनेक लोकांशी जोडले गेले. रेखाचे बालपणही वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळते. विशेषत: जेव्हा रेखाच्या लव्ह लाईफशी (Love Life) संबंधित असते तेव्हा अनेक न उलगडलेली रहस्ये समोर येतात. आज आपण रेखाच्या आयुष्याशी निगडीत अशा रहस्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांची खूप चर्चा झाली पण कधीच उकल होऊ शकली नाही. (Darkest secrets of Rekha life Unrevealed secrets related to Rekha Love Life you will also be shocked to know nz)
रेखा आणि अभिनेता विनोद मेहरा (Vinod Mehra) यांच्या नात्याबाबत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक गोष्टींची नोंद आहे. कधी विनोद मेहरा यांना रेखाचे पहिले प्रेम तर कधी तिचा पहिला नवरा म्हटले जायचे. मात्र, रेखाने या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे सिमी गरेवालच्या प्रसिद्ध टॉक शो 'रेंडेझव्हस'मध्ये सांगितले होते. पण प्रसिद्ध पत्रकार यासिर उस्मान यांच्या 'रेखा : अॅन अनटोल्ड स्टोरी' (Rekha: An Untold Story) या पुस्तकात रेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाचा उल्लेख आहे. यासिर उस्मानने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, 'रेखाने विनोद मेहरासोबत लग्न केले. दोघांचे हे पहिले लग्न होते पण दोघांनीही या लग्नाबद्दल कधीच सांगितले नाही. दोघांचे लग्न कोलकात्यात झाले होते. लग्नानंतर विनोद आपल्या नववधू रेखासोबत घरी पोहोचला तेव्हा विनोदची आई कमला मेहरा यांनी रेखाला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. एवढेच नाही तर रेखा तिच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकली तेव्हा कमला मेहराने तिला ढकलले.
रेखाला तुम्ही ऑन-स्क्रीन (On-Screen) अनेकदा कुंकू लावताना पाहिलं असेल. पण रेखा ऑफस्क्रीनही (Off-Screen) सिंदूर लावते. रेखा असे का करते? जेव्हा जेव्हा तिला याबद्दल विचारले गेले तेव्हा तिने सांगितले की मला कुंकू लावायला आवडते. पण ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू सिंग (Neetu Singh) यांच्या लग्नात 22 जानेवारी 1980 रोजी रेखा जेव्हा सिंदूर लावून पोहोचली तेव्हा संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. त्या काळात रेखा आणि मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यात सुरू असलेले अफेअर (Affair) जोरात सुरू होते. त्यावेळी सगळ्यांना वाटले की रेखाने अमिताभच्या नावाचे सिंदूर भरून आली आहे. पण सिमी गरेवालने तिच्या 'रेन्डेझव्हस' या टॉक शोमध्ये (Talk Show) रेखाला अमिताभ बच्चनबद्दल प्रश्न विचारला तेव्हा रेखा म्हणाली, 'संपूर्ण जग अमिताभजींचे चाहते आहे. मी पण त्याची फॅन (Fan) आहे तर मग एवढी मोठी गोष्ट का झाली.
अवॉर्ड फंक्शन असो की इतर कुठलाही प्रसंग, एखादी व्यक्ती रेखाला तिच्या सावलीसारखी चिकटलेली दिसते. नेहमी पांढऱ्या आणि काळ्या शर्ट पँट किंवा कोट-पॅंटमध्ये दिसणारी ही व्यक्ती महिला आहे. फरजाना (Farzana) असे या महिलेचे नाव आहे. फरजाना ही रेखाची सचिव (Secretary) आहे. फरजाना आणि रेखा 32 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. या दोघांच्या नात्याबाबत अनेक गोष्टी मीडियात ऐकायला मिळतात. प्रसिद्ध पत्रकार मोहनदीप यांनी त्यांच्या 'युरेखा' या पुस्तकात फरजानाबद्दल बरंच काही लिहिलं आहे, 'पूर्वी फरजाना रेखाची हेअरस्टाइलिस्ट होती. पण रेखाने हळूहळू फरझानावर इतका विश्वास ठेवायला सुरुवात केली की तिने फरझानाला तिची पर्सनल सेक्रेटरी बनवलं. आज रेखाच्या सर्वात जवळ कोणी असेल तर ती फरजाना. रेखाच्या बेडरूममध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही, असा दावाही मोहनदीपने आपल्या 'युरेखा' (Youreka) या पुस्तकात केला आहे. रेखा तिच्या खोलीत फक्त खास लोकांनाच परवानगी देते. फरजाना देखील या खास लोकांपैकी एक आहे. इतकेच नाही तर 'रेखाचे कपडे निवडण्यापासून रेखाने फोनवर कोणाशी बोलायचे आणि फरजाना ठरवते', असेही या पुस्तकात लिहिले आहे.