'तारे जमीन पर' मधील ईशानचा बदलेला लूक पाहून तुम्हीही व्हाल हैराण; पाहा फोटो

आमिर खानचा 'तारे जमीन पर' हा लोकप्रिय चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. 

Updated: Jul 4, 2022, 04:15 PM IST
'तारे जमीन पर' मधील ईशानचा बदलेला लूक पाहून तुम्हीही व्हाल हैराण; पाहा फोटो title=

मुंबई : आमिर खानचा 'तारे जमीन पर' हा लोकप्रिय चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटात आमिर खानसोबत दर्शील सफारी छोट्या ईशानच्या भूमिकेत दिसला होता. 2007 मध्ये आलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. दर्शील सफारीने या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली.

आज चित्रपट प्रदर्शित होऊन 15 वर्षे झाली आहेत. या वर्षांत दर्शील सफारीचा लूक पूर्णपणे बदलला आहे. २५ वर्षीय दर्शील आता तरुण हँडसम माचो मॅन बनला आहे. दर्शील सफारीचा एक ताजा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून लोकं हैराण झाले आहेत आणि विश्वास बसत नाही की हा तोच छोटा ईशान आहे. जो चित्रपटात वाचन-लेखनाच्या समस्येशी झगडतो.

तारे जमीन पर मधील ईशान अवस्थी उर्फ ​​दर्शील सफारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. जे  चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये ईशान समुद्रकिनाऱ्यावर उभा असताना त्याच्या मागे सूर्यास्ताचे सुंदर दृश्य दिसत आहे. फोटोमध्ये दर्शील सफारी रस्ट ब्राऊन कलरचा फुल स्लीव्ह टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. फोटोत स्माईल देणारा दर्शील खूपच प्रेमळ दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दर्शील सफारीच्या या ताज्या फोटोवर कमेंट करण्यापासून चाहते स्वतःला रोखू शकत नाहीत. फोटोवर कमेंट करत एका सोशल मीडिया यूजरने लिहिलं की, "इशान अवस्थी किती मोठा झाला आहे". तर दुसर्‍या यूजरने लिहिलंय की, "कितना बडा हो गया भाई तू". त्याचबरोबर आणखी एका युजरने लिहिलं आहे की, "तू अप्रतिम अभिनय करतोस. तुझं भविष्य उज्ज्वल आहे".