डान्सिंग काकांच्या स्टाईलमध्ये हुबेहुब थिरकली 'ही' विदेशी तरूणी

आजकाल सोशल मीडियावर 'अजब' डान्सचे व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहेत. 

Updated: Jun 2, 2018, 11:10 AM IST
डान्सिंग काकांच्या स्टाईलमध्ये हुबेहुब थिरकली 'ही' विदेशी तरूणी  title=

मुंबई : आजकाल सोशल मीडियावर 'अजब' डान्सचे व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहेत. कधी तरी नागीण डान्स, काही दिवसांपूर्वी दीराच्या लग्नात फिल्मी स्टाईलमध्ये थिरकणारी वहिनी 'व्हायरल' झाली होती. आता त्यापाठोपाठ मध्यप्रदेशातील प्राध्यापक संजीव श्रीवास्तव यांच्या डान्सचे व्हिडिओ  झपाट्याने व्हायरल होत आहे. 

'खुदगर्ज' चित्रपटातील  'आप के आ जाने से' आणि त्यानंतर 'चढ़ती जवानी' या गाण्यावरील डान्स प्रेक्षकांनी पाहिला. अवघ्या काही तासात जगभरात प्राध्यापक संजीव श्रीवास्तव यांच्या डान्सची धूम पसरली आहे.म्हणूनच खास 'संजीव श्रीवास्तव' यांच्या स्टाईलमध्येच थिरकारणार्‍या न्यूयॉर्क स्थित कोरियोग्राफर दीप बरारनेही व्हिडिओ शेअर केला आहे. 

 

दीपचा खास अंदाज 

'आप के आ जाने से' या गाण्यावर संजीव श्रीवास्तव यांच्याप्रमाणेच हुबेहुब दीपने डान्स केला आहे. संजीन यांची प्रत्येक स्टेप तिनं फॉलो केली आहे. दीपने फेसबुक अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करताना " मी या सुपरस्टारची सगळ्यात मोठी फॅन आहे. या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा' असा खास संदेश तिनं लिहला आहे. 

 

शिवराज सिंहाचेही खास ट्विट - 

प्राध्यापक संजीव श्रीवास्तव यांच्या डान्सचं ट्विटवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही कौतुक केले आहे. " आमच्या विदिशातील भोपाळमधील प्राध्यापक श्री संजीव श्रीवास्तव यांच्या जिंदादिल अंदाजामुळे भारतभर इंटरनेटवर धूम आहे. आमच्या मध्यप्रदेशाचं पाणीचं तसं आहे" अशा शब्दांत शिवराज सिंह चौहान यांनी कौतुक केले आहे.