सीतेच्या भूमिकेआधी Deepika Chikhlia यांनी 'अशा' चित्रपटांमध्ये केले काम, बी ग्रेड अभिनेत्री म्हणून मिळाली होती ओळख

Deepika Chikhlia : दीपिका चिखलिया यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. पण तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता जेव्हा दीपिका यांनी लोकांनी बी ग्रेड अभिनेत्री म्हणून ट्रोल केले होते. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 29, 2023, 02:24 PM IST
सीतेच्या भूमिकेआधी Deepika Chikhlia यांनी 'अशा' चित्रपटांमध्ये केले काम, बी ग्रेड अभिनेत्री म्हणून मिळाली होती ओळख title=
(Photo Credit : Social Media)

Deepika Chikhlia : रामानंद सागर यांची रामायण ही मालिका सगळ्यात जास्त गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. आजही अनेक लोक या रामायणाचे एपिसोड पाहतात. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलियाचा 58वा वाढदिवस आहे. दीपिका चिखलिया यांना खरी ओळख ही 'रामायण' आणि 'लव कुश' या मालिकांमधून मिळाली आहे. पण तुम्हाला माहितीये का? दीपिकानं 1983 सालीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तर त्याच्या 4 वर्षांनंतर म्हणजेच 1987 मध्ये त्यांना प्रेक्षक रामायणामुळे ओळखू लागले होते. दरम्यान, दीपिका यांनी सीतेची भूमिका साकारायला नको यावर सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाला होता. नक्की या मागचं नक्की कारण काय होतं हे आज आपण जाणून घेणार आहोत.  

दीपिका यांच्या फिल्मी करिअर विषयी बोलायचे झाले तर त्यांचा पहिला चित्रपट 'सुन मेरी लैला' हा होता. त्यानंतर त्या 'रुपये दस करोड', 'घर का चिराग' आणि 'खुदाई' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी दीपिका यांनी बोल्ड भूमिका करण्यास सुरुवात केली. 'चीख' आणि 'रात के अंधेरे में' या चित्रपटात त्यांच्या बोल्ड भूमिका पाहायला मिळाल्या. त्यामुळे त्यांना अनेक लोक बी ग्रेड अभिनेत्री म्हणून ओळखू लागले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Adipurush : पुन्हा ट्रोल होताच ओम राऊतनं सीतेच्या लूकमध्ये केला 'हा' बदल

1986 साली रामायणसाठी कलाकारांची टेस्ट घेणं सुरु झालं होतं. त्यासाठी दीपिका यांनी देखील स्क्रिन टेस्ट दिली होती. त्यांना जेव्हा सीतेच्या भूमिकेत पाहिले तेव्हा अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या सीतेच्या भूमिकेवरून वाद सुरु झाले होते. पण दीपिका यांनी त्यांच्या अभिनयानं सगळ्यांच्या आश्चर्यात पाडलं आणि प्रेक्षकांनी त्यांना सीतेच्या रुपात स्विकारले. त्यानंतर सगळ्यांना विसर पडली की दीपिका यांनी कधी बोल्ड भूमिका साकारल्या होत्या आणि त्यांची सितेची भूमिका ही सगळ्यांच्या मनात घर करून राहिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, रामायणावर आधारीत त्यानंतर चित्रपट आले नाहीत. कार्टूनमध्ये आपण असे काही मालिका किंवा मग चित्रपट पाहिले पण मोठ्या पडद्यावर असा कोणताही चित्रपट आला नाही. कारण अनेकांनी याच कलाकारांना राम, सिता आणि लक्ष्मण माणले होते. मात्र, आता लवकरच रामायणावर आधारीत एक चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार असून त्याचं नाव आदिपुरुष असं आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.