Adipurush : पुन्हा ट्रोल होताच ओम राऊतनं सीतेच्या लूकमध्ये केला 'हा' बदल

Adipurush Sita Look : आदिपुरूष चित्रपटातील सितेचा लूक प्रदर्शित करण्यात आला. या आधी सितेच्या लूकवरून ओम राऊत यांना ट्रोल करण्यात आले होते. आता त्यांनी त्यांची चूक सुधारत पोस्टरमध्ये बदल केला आहे. तर चित्रपटातील सितेच्या लूकचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 29, 2023, 12:50 PM IST
Adipurush : पुन्हा ट्रोल होताच ओम राऊतनं सीतेच्या लूकमध्ये केला 'हा' बदल title=
(Photo Credit : Kriti Sanon Instagram)

Adipurush : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आदिपुरूषचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत होता. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, अभिनेत्री कृती सेनन आणि अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. रामनवमीच्या मुहुर्तावर चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. तर हनुमान जयंतीच्या दिवशी चित्रपटातील हनुमानाचा लूक समोर आला होता. आता पोस्टर शेअर करत सीतेचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

क्रिती सेनन या चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे. तर चित्रपटातील तिचा पहिला लूक आता समोर आला आहे. या पोस्टरमध्ये क्रिती सीतेच्या वेशात दिसत आहे. इतकंच काय तर क्रितीनं भगव्या रंगाची साडी नेसली आहे. तिचा असा साधारण लूक प्रेक्षकांच्या पसंतीस आल्याचं पाहायला मिळत आहे. क्रितीचा हा लूक ऑफिशियल आदिपुरूष या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर या पोस्टरमध्ये क्रितीचे पाणावलेले डोळे, या लूकमध्ये क्रितीच्या चेहऱ्यावर ग्लो दिसत आहे. तर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे ते म्हणजे तिच्या भांगेत असलेल्या कुंकूनं. या आधी प्रदर्शित झालेल्या सितेच्या पोस्टरमध्ये क्रितीच्या भांगेत कुंकू नव्हता. त्यावरून निर्मात्यांना ट्रोलिंगचा सामना करण्यात आला होता. हे पाहता निर्मात्यांनी त्यांची चूक सुधारण्यासाठी ते पोस्टर डिलीट केलं होतं आणि आता एक नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे पोस्टर शेअर करत अमर है नाम, जय सिया राम! असे कॅप्शन देण्यात आले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी न्यूयॉर्कमध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. क्रितीनं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लूकचं एक पोस्टर शेअर केलं आहे. दरम्यान, अशी माहिती समोर येत आहे की चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा सैफ अली खान हा प्रमोशनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्याचं निर्मात्यांकडे खास कारण असल्याचं म्हटलं जातं. फला प्रमोशनपासून दूर ठेवण्यासाठी मेकर्सनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सैफ प्रमोशनमध्ये सामील झाला तर त्याला वादग्रस्त प्रश्न विचारण्यात येतील आणि त्याला त्यावर उत्तर द्याव लागेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Ponniyin Selvan 2 नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल इतक्या कोटींची कमाई!

आदिपुरुष या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही टी-सीरीजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्सचे राजेश नायर यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.