Met Gala 2019 : दीपिकाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Vogue ने दीपिकाचा मेट गालासाठी तयार होतानाचा व्हिडिओ शेअर आहे.

Updated: May 9, 2019, 04:35 PM IST
Met Gala 2019 : दीपिकाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात मेट गाला २०१९ या सोहळ्याची चांगलीच चर्चा आहे. मेट गालासाठी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांनी हजेरी लावली होती. मेट गालामधील प्रियंका चोप्राच्या ड्रेसमुळे तिला चांगलंच ट्रोल केलं गेलं तर दुसरीकडे दीपिकाच्या बार्बी डॉल लूकला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. या सोहळ्यात सहभागी झालेली बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोणची पिंक कार्पेटवरील एन्ट्री लक्षवेधी ठरली. 

बार्बी डॉलप्रमाणे गुलाबी रंगाचा आकर्षक गाऊन आणि हेअर स्टाईल करत दीपिकाने साऱ्याचचं लक्ष वेधून घेतलं. दीपिकाच्या या लूकसाठी मोठी मेहनत घेण्यात आली. Vogue ने दीपिकाचा मेट गालासाठी तयार होतानाचा व्हिडिओ शेअर आहे.

२०१७ पासून मेट गालामध्ये उपस्थित राहणाऱ्या दीपिकाने पहिल्या दोन वर्षांमध्ये आपल्या लूकविषयी संमिश्र प्रतिसाद मिळवली होती. मात्र यंदाच्या २०१९च्या मेट गालामध्ये दीपिकाच्या लूकला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे. दीपिकाच्या बार्बी डॉल लुकला मोठी पसंती मिळली.