प्रियंकाच्या ट्रोल झालेल्या लुकवर आईची 'कूल' प्रतिक्रिया

'मी प्रियंकाचा फोटो पाहताच...'

Updated: May 9, 2019, 03:37 PM IST
प्रियंकाच्या ट्रोल झालेल्या लुकवर आईची 'कूल' प्रतिक्रिया

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या मेट गाला २०१९ मध्ये देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या लुकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. प्रियंकाच्या या मेट गाला लुकने तिच्या देसी चाहत्यांना चांगलंच आश्चर्यचकित केलं. मेट गाला २०१९ मध्ये प्रियंकाला ट्रोल केलं गेलं तर दुसरीकडे प्रियंकाची आई मधु चोप्रा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Met Gala 2019 : प्रियंका चोपड़ा का लुक हुआ Troll, किसी ने कहा पोकेमोन, तो कोई बोला...

मेट गाला २०१९ मध्ये प्रियंका सिल्व्हर रंगाचा गाऊन आणि ड्रामा मेकअपमध्ये सर्वासमोर आली तर निक जोनास रॉयल अंदाजात दिसत होता. प्रियंकाच्या या लुकला अनेक जणांनी ट्रोल केलं. तात्या विंचूपासून अगदी विरप्पनच्या मिशांपर्यंत तिच्या लूकची खिल्ली उडवण्यात आली. आता प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी प्रियंकाच्या ड्रेसबाबत कूल रिअॅक्शन दिली आहे. मधु चोप्रा यांनी प्रियंकाच्या गेटअपबाबत आनंद व्यक्त केला आहे. 

एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, 'मी प्रियंकाचा फोटो पाहताच तिला फोन केला होता. तिला पाहून मला तिला मिठी माराविशी वाटत होती. प्रियंका आणि निक दोघेही अतिशय सुंदर दिसत होते आणि दोघांची जोडीही अतिशय खास दिसत होती. प्रियंका आणि निकची जोडी अतिशय शोभून दिसत होती. निकला पाहून मला एका डॉनची आठवण आल्याची' प्रतिक्रिया मधु चोप्रा यांनी दिली आहे. 

ट्रोल करण्यात आलेल्या प्रियंकाच्या मेट गाला गाऊनची किंमत जवळपास ४५ लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे. तिचे हिऱ्याचे कानातले जवळपास १० लाख रूपयांच्या आसपास असल्याची माहिती आहे. प्रियंकाच्या या गाऊनमध्ये गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे पंख लावण्यात आले होते. २०१७ मध्येही प्रियंकाचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या दरम्यान प्रियंका आणि निक यांच्या प्रेमसंबंधांबाबत मोठी चर्चा होती.