Cannes Film Festival 2022 : इतके अत्याचार का ? दीपिकाची ही अवस्था पाहून चाहतेही हळहळले

 बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर उतरली होती. ब्लॅक-गोल्ड कलरच्या साडीत रेड कार्पेटवर ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. 

Updated: May 18, 2022, 07:20 PM IST
Cannes Film Festival 2022 : इतके अत्याचार का ? दीपिकाची ही अवस्था पाहून चाहतेही हळहळले  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर उतरली होती. ब्लॅक-गोल्ड कलरच्या साडीत रेड कार्पेटवर ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे तिच्या लुक्सची सोशल मीडियवर चर्चा होणार नाही असं होऊ शकत नाही. तिची सोशल मीडियावर चर्चा तर रंगलीच, मात्र दुसऱ्या ठिकाणी ती ट्रोलही होतेय. 

फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी याने डिझाईन केलेली ब्लॅक-गोल्ड सीक्वेन्स साडी नेसून दीपिका कान्सच्या रेड कार्पेट अवतरली होती. या साडीसोबत दीपिकाने सब्यसाची ज्वेलरी बंगाल रॉयल कलेक्शनमधील chandelier ईअररिंग्स घातले होते. तसेच फंकी हेअरबन, त्यावर गोल्डन हेडबँड, ड्रामेटिक आयलाईनर, न्यूड लिप्स आणि हेवी ईअररिंग्स असा तिचा रेड कार्पेट लूक होता. 

कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये रेड कार्पेट फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या लुक्सची चर्चा झालीच. त्याचबरोबर दीपिकाला ट्रोलही करण्यात आले. दीपिकाचे हेवी झालेले लोंबकळते काळातले पाहून अनेक नेटकऱ्यांना तिची दया आली. तर काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली देखील उडवली. अनेकांनी दीपिकाच्या आयलाईनरवरून तिला ट्रोस केले तर तर काहींनी तिच्या चेहऱ्यांवरील सुरुकुत्यांवरही तिची टेर खेचली. 

 

चाहत्यांनी कान टोचले 
‘दीपिकाचे कानातल्या (कानाच्या पाळी) मदतीसाठी ओरडत आहेत,’अशी कमेंट एका चाहत्याने केली. ‘बिचारे कान’, अशी कमेंट एकाने केली.  तर एका युजरने चक्क #justicefordeepikasearlobes ट्रेंड करायला सुरूवात केली.