कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या दीपिकाकडे शॅम्पूसाठीही पैसे नाहीत, का आली ही वेळ?

ही अभिनेत्री सध्या भलत्याच कारणामुळे जवळपास सगळ्यांनाच थक्क करत आहे

Updated: Jan 13, 2022, 04:22 PM IST
कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या दीपिकाकडे शॅम्पूसाठीही पैसे नाहीत, का आली ही वेळ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या प्रत्येक फोटोला साधारण लाखोंच्या घरात लाईक्स असतात. दीपिकानं काहीही करो, चाहत्यांसाठी तिचं साधं स्मितहास्यसुद्धा पुरेसं असतं. अशी ही अभिनेत्री सध्या भलत्याच कारणामुळे जवळपास सगळ्यांनाच थक्क करत आहे. अहो का काय विचारता, त्यामागचं कारणंच तसं आहे. (Deepika Padukone)

दीपिकाकडे तसं पाहिलं तर, कोट्यवधींची संपत्ती. पण, आता म्हणे बॉलिवूडच्या या मस्तानीकडे साधा शॅम्पूही विकत घेण्याचे पैसे नाहीत. 

हे आम्ही नाही, दीपिकालाच फॉलो करणारे तिचे चाहते, आणि फॉलोअर्स म्हणत आहेत. 

निमित्त ठरतोय तो म्हणजे तिनं पोस्ट केलेला एक फोटो. 

विस्कटलेल्या केसांनी अर्धवत झाकलेला चेहरा, स्क्रीनवर रोखलेली नजर असा एक फोटो दीपिकानं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला. 

लोकं ते केसांसोबतच जे काही करतात ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि सपशेल अपयशी ठरले, असं म्हणत तिनं स्वत:चीच खिल्ली उडवली. 

रणवीरनं तिच्या या फोटोवर कमेंट करत, 'तेरी जुल्फों मे खोया रहूँ' असं म्हटलं. तर नेटकऱ्यांनी मात्र तिची खिल्लीच उडवली. 

अगं कोंडा झालाय का...., तुझ्याकडे शॅम्पूसाठीपण पैसे नाहीत का, शिंका येतील बाजूला कर ते केस... अशा एक ना अनेक कमेंट तिच्या या फोटोवर करण्यात आल्या आहेत. 

चाहत्यांच्या या कमेंट पाहता दीपिकानं त्याला काही उत्तर दिलेलं नाही. पण, खरंच तिच्य़ाकडे शॅम्पूसाठीचे पैसे नसतील तर....?