VIDEO:'माझ्या नवऱ्याची बायको' गाण्यावर दीपिका आणि प्रियांकाने धरला ठेका

हा व्हीडिओ सोशल मीडियावर ठरतोय हिट.

Updated: Sep 13, 2018, 07:34 PM IST
VIDEO:'माझ्या नवऱ्याची बायको' गाण्यावर दीपिका आणि प्रियांकाने धरला ठेका title=

मुंबई: अलीकडे सोशल मीडियावर एखादा मजेशीर व्हीडिओ किंवा इंग्रजी गाण्याला बॉलीवूड टच देण्याचा ट्रेंड व्हायरल झाला आहे. आता हा ट्रेंड मराठी मालिकांच्या टायटल साँगपर्यंत पोहोचला आहे. सध्या टेलिव्हिजनवर गाजत असलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या टायटल साँगचा असाच मजेशीर वापर करण्यात आला आहे. बॉलीवूडच्या बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'पिंगा' या गाण्याचा व्हीडिओ आणि 'माझ्या नवऱ्याची बायको'चे टायटल साँग असे भन्नाट कॉम्बिनेशन असणारा हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

'मनोज शिंगस्टे एडिटींग' नावाच्या युट्यूब चॅनवरील हा व्हिडिओ आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये फेसबुकवर चार हजार जणांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला एक लाख ९० हजारपेक्षा व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हीडिओमध्ये दीपिका-प्रियांकाच्या स्टेप्स आणि 'माझ्या नवऱ्याची बायको'च्या टायटल साँगचे बोल यांचा मेळ अफलातून साधण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांकडून या व्हीडिओला पसंती मिळत आहे.